
निवडणूक
कुंभी बॅंक; २१ जागांसाठी ३८ उमेदवारी अर्ज वैध
कुडित्रे; ता. ११ ः येथील कुंभी कासारी सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणुक कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये दाखल झालेल्या ७६ अर्जापैकी ३८ उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने २१ जागांसाठी ३८ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
या निवडणुकीपूर्वी बँकेची सांपत्तिक स्थिती चांगली असून बँकेने १०० कोटी ठेवीचा टप्पा ओलांडल्याने रिझर्व बँकेच्या नियमानुसार सर्वसाधारण गटातील उमेदवाराचे शेअर्स रक्कम २ हजार तर ५० हजार रुपये ठेव व राखीव जागांसाठी उमेदवारांना १ हजार शेअर्स व २५ हजार ठेव ही अट लागू झाली आहे.
सर्वसाधारण गटातील २६ अर्ज अवैध ठरले. भटक्या जाती विमुक्त जमातीमध्ये दोन अर्ज आले होते, पण दोन्ही उमेदवारांची शेअर्स किंवा ठेव रक्कम अपूर्ण असल्याने एका जागेसाठी एकही उमेदवारी अर्ज वैध ठरला नाही.
सर्वसाधारण गटातील १६ प्रतिनिधींसाठी ५४ जणांच्याकडून ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.पैकी २८ अर्ज अवैध तर २६ अर्ज वैध ठरले आहेत. अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधीसाठी १ जागेसाठी ५ अर्ज, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी १ जागेसाठी आलेले २ अर्ज अपात्र , इतर मागासवर्गीय प्रतिनिधी साठी १ जागेसाठी ५ अर्ज, महिला २ जागेसाठी ३ उमेदवार यांचे ४ अर्ज वैध ठरले आहेत.
अंतिम यादी शुक्रवारी (ता. १२) प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी प्रदीप मालगावे यांनी सांगितले.