कुंभी नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

कुंभी नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

कुंभी नदीत बुडालेल्या तरुणाचा
मृतदेह तीन दिवसांनी सापडला


सांगरुळ, ता.१४ः कुंभी नदीत सांगरूळ बंधाऱ्याजवळ शुक्रवारी अंथरुण धुवून झाल्यानंतर हातपाय धुण्यासाठी गेलेला तरुण पाण्यात पाय घसरुन पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला होता. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम घेतली पण तो सापडून आला नाही. सतीश गवस (वय ३५, मूळ रा. चंदगड. सध्या रा. पडळ फाटा, ता. पन्हाळा) असे असे या तरुणाचे नाव आहे. त्याला पोहता येत नसल्याने ही दुर्घटना घडली. तीन दिवसानंतर आज मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सतीश गवस हा पडळ फाट्यावर भंगार व्यवसाय करणारे रतन जगताप यांच्याकडे कामगार म्हणून काम करतो. शुक्रवारी सकाळी जगताप यांच्या कुटुंबातील महिला व सतीश अंथरूण व कपडे धुण्यासाठी सांगरुळ बंधाऱ्याजवळ आले होते.
एक वाजेपर्यंत कपडे धुवून झाल्यानंतर रतन जगताप व सतीश गवस हे हातपाय धुण्यासाठी बंधाऱ्याच्या पूर्वेकडील बाजूच्या दरवाजाजवळ आले. या दरवाजातून सध्या पाणी सोडण्यात येत असल्याने पाण्याचा वेग व दाब मोठ्या प्रमाणावर आहे. सतीश पाय धुताना त्याचा तोल गेल्याने वेगवान प्रवाहाबरोबर तो वाहून गेला. नदीपात्रात बुडालेल्या ठिकाणी शोध घेतला, मात्र रात्रीपर्यंत तो सापडून आला नाही. यामुळे शोध मोहीम रात्री थांबवली. आज, रविवारी गवस याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com