तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणाचा मृत्यू
तरुणाचा मृत्यू

तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

03576
...

तणनाशक प्राशन केलेल्या कोपार्डेतील
शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

कुडित्रे ः कोपार्डे (ता.करवीर) येथील एका शेतकरी तरूणाने तणनाशक प्राशन केले होते. मंगळवारी दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सरदार उर्फ दगडू आकाराम पाटील (वय ३५) असे त्याचे नाव आहे. घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सरदार हा वडिलोपार्जित शेती करत होता. सोमवारी (ता.२२) रात्री १० वाजता त्याने तणनाशक प्राशन केले. यानंतर त्याला त्रास सुरू झाला. सरदारला नातेवाईकांनी तातडीने शासकीय रुग्णालयात व तेथून सकाळी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.