
बारावी परीक्षेत घवघवीत यश
श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयाचे यश
कुडित्रे ः श्रीराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत यश मिळविले. या परीक्षेत विज्ञान विभागाचा १०० टक्के निकाल लागला. विज्ञान विभागात धनश्री कोळी (८८ टक्के) प्रथम, अनुजा लोखंडे (८३) द्वितीय, तर अमृता पोवार (७६.६७) हिने तृतीय क्रमांक मिळविला.
वाणिज्य विभागाचा निकाल ९९ टक्के लागला. पायल भगणे (८८.३३ टक्के) प्रथम, वैष्णवी रोहिले (८७.१७) द्वितीय, तर अमृता चौगले (८६.१७) हिने तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेत वैष्णवी पाटील (८७.३३) प्रथम, धीरज पोवार (८६.३३) द्वितीय, तर मधुरा सुतार (८२.६७) हिने तृतीय क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव आमदार जयंत आसगावकर, अध्यक्ष य. ल. खाडे, उपाध्यक्ष के. ना. जाधव, सर्व संचालक, प्राचार्य ए. डी. कुलकर्णी, उपप्राचार्य सी. एन. वाळके यांचे मार्गदर्शन लाभले.