विशेष सहाय्य , संजय गांधी निराधार, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घ्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशेष सहाय्य , संजय गांधी निराधार, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घ्यावा
विशेष सहाय्य , संजय गांधी निराधार, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घ्यावा

विशेष सहाय्य , संजय गांधी निराधार, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घ्यावा

sakal_logo
By

विशेष सहाय्य योजनांचा लाभ घ्या

करवीर तहसील कार्यालयाचे आवाहन

कुडित्रे, ता.३ ः राज्यासह जिल्ह्यात निराधार, अंध, अपंग, शारीरिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, परितक्त्या, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्यासाठी विशेष सहाय्य योजना सुरू आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ, विधवा व अपंग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ, विधवा व अपंग निवृत्ती वेतन या योजना राबविण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करवीर तहसील कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास १,००० रुपये प्रतिमहिना तसेच या अंतर्गत विधवा महिलेस १ अपत्य असल्यास १,१०० रुपये, २ अपत्ये असल्यास १,२०० रुपये अर्थसहाय्य दिले जाते. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत ६५ व ६५ वर्षावरील निराधार व्यक्तींना प्रति महिना १,००० रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ, विधवा, अपंग निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना प्रति महिना १,००० रुपये, दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील कोणत्याही कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृताच्या वारसास एकदाच एक रक्कम २०,००० रुपये शासनामार्फत दिले जातात .
या योजनांसाठी अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, मुलांचे दाखले, विधवा असल्यास पतीचा मृत्यू दाखला, अपंग असल्यास सीपीआरकडील अपंग प्रमाणपत्र, परितक्त्या किंवा अविवाहीत असल्यास तलाठी दाखला इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. लाभार्थी यांनी विशेष सहाय्य योजनेचे अर्ज हे महा ई सेवा केंद्रातून ऑनलाईन करुन घेण्याची दक्षता घ्यावी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शुल्क रक्कम ३३ रुपये ६० पैसे इतकी आहे. पात्र लाभार्थी यांचे मंजुरीपत्र देखील महा ई सेवा केंद्रात उपलब्ध होतील, अशी माहिती तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
...

‘करवीर तालुक्यातील वरील विशेष सहाय्य योजनाअंतर्गत प्राप्त सर्व अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने स्वीकारुन त्याची ऑनलाईन पध्दतीनेच निर्गती करण्याबाबतच्या सर्व सूचना संबंधित महा ई सेवा केंद्र यांना दिलेल्या आहेत. तहसीलदार कार्यालयात नागरिकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे घेवून येण्याची आवश्यकता नाही.

स्वप्नील रावडे, तहसीलदार