कागल : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कार्यक्रम
कागल : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कार्यक्रम

कागल : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कार्यक्रम

sakal_logo
By

03495
कागल ः केडीसीसी बँकेच्यावतीने बेरोजगार युवकांना कर्ज पुरवठ्याची मंजुरीपत्रे देताना बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ. शेजारी बँकेचे संचालक प्रताप माने व इतर प्रमुख.

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे
केडीसीसीकडून अर्थसहाय्य ः मुश्रीफ


कागल, ता. १२ : केडीसीसीकडून कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य केले जात असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मराठा समाजातील हजारो बेरोजगार युवकांना उद्योगधंदे, व्यवसाय, स्वयंरोजगार व रोजगारासाठी हा अर्थपुरवठा केल्याचेही ते म्हणाले.
येथे महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्जमंजुरी पत्रांच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे संचालक प्रताप माने होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, मराठा समाजासह ओबीसी, कुणबी, मागास व भटक्या समाजाच्या बेरोजगार तरुणांनाही उद्योगधंदे व व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्याचे धोरण सरकारने ठेवले आहे. या सर्व योजनांमधून अर्थ पुरवठा करण्यासाठी बँक सज्ज आहे. मंत्री मुश्रीफ म्हणाले की, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ, संत रोहिदास विकास महामंडळ या योजनांमधूनही जोपर्यंत सरकार या योजनेचे व्याज देत राहील तोपर्यंत तब्बल ५०० कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्याचीही बँकेची तयारी आहे.
श्री. माने म्हणाले की, बेरोजगारी वाढत असताना बँकेने बेरोजगारांसाठी केलेला हा कर्जपुरवठा आशेचा नवा किरण आहे. स्वागत बँकेचे कागल तालुका विभागीय अधिकारी शंकरराव निंबाळकर यांनी केले. आभार म्हाकवेचे माजी उपसरपंच रमेश पाटील यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02167 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top