कागल : रमजान ईद पारंपारिक पद्धतीनं मोठया उत्साहात साजरी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : रमजान ईद पारंपारिक पद्धतीनं मोठया उत्साहात साजरी.
कागल : रमजान ईद पारंपारिक पद्धतीनं मोठया उत्साहात साजरी.

कागल : रमजान ईद पारंपारिक पद्धतीनं मोठया उत्साहात साजरी.

sakal_logo
By

कागलात रमजान ईद उत्साहात साजरी...
कागल ता.३ : कागल शहरासह परिसरात रमजान ईद आज पारंपारिक पध्दतीने उत्साहात साजरी करण्यात आली. तब्बल दोन वर्षानंतर ईदगाह मैदानावर ईद निमित्त सामूहीक नमाज पठण करण्यात आले.
कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्ष सार्वजनिक सामूहिक कार्यक्रमांवर असलेली बंदी उठविण्यात आली. त्यामुळे मुस्लिम बांधवात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मौलाना अली या धार्मिक गुरूंनी पवित्र रमजान सण आणि यानिमित्ताने आदा केल्या जाणाऱ्या नमाज पठणाची माहिती उपस्थित मुस्लिम बांधवांना दिली. त्यानंतर सामूहिक नमाजपठण करण्यात आले. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी आलिंगन देत पवित्र रमजान ईदच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल पोलिस ठाण्याच्यावतीने ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस निरिक्षक अजितकुमार जाधव, सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक वाकचौरे, पोलीस उपनिरिक्षक रविकांत गच्चे यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. कागल नगरपरिषदेच्यावतीने तहसिलदार शिल्पा ठोकडे, नगरसेवक चंद्रकांत गवळी यांनी मंत्री मुश्रीफ यांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी नगरसेवक प्रविण काळबर, नितीन दिंडे, आनंदा पसारे, सतिश घाटगे, संजय चितारी , नितीन कांबळे उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि शासकिय अधिकाऱ्यांनी मंत्री मुश्रीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर मोठी गर्दी केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02171 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top