कागल : कागल शहरात चिंच वृक्ष फुलला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : कागल  शहरात चिंच वृक्ष फुलला
कागल : कागल शहरात चिंच वृक्ष फुलला

कागल : कागल शहरात चिंच वृक्ष फुलला

sakal_logo
By

कागल शहरात चिंच वृक्ष फुलला
कागल : कागल शहर व परिसरात चिंच वृक्ष बहरल्याचे चित्र आहे. यंदा या वृक्षांना मोठ्या प्रमाणात फुले लागली आहेत.
कागल शहरात मोठ्या प्रमाणात जूनी चिंचेची झाडे आहेत. गैबी दर्गा , शेख शिराज दर्गा या ठिकाणा बरोबर श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल , श्री शाहू हायस्कूल , राधाकृष्ण मंदिर, पंचमुखी चौक, बसस्थानकाजवळील गणेश मंदिरच्या मागील बाजूस रस्त्यालगत तसेच कागल-मौजे सांगाव रस्त्यावर अशा बऱ्याच ठिकाणी चिंचेची झाडे आहेत. ही चिंचेची झाडे फुलांनी बहरली आहेत. कडक उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असतानाही हे झाड तग धरते. चिंचेमध्ये पोस्टीक घटक असतात. या झाडाला सर्व प्रकारचे हवामान चालते. चिंचा पक्व झाल्यानंतर एका मोठ्या झाडापासून सुमारे २०० किलोपर्यंत उत्पन्न मिळते. ग्रामीण भागातील बहुतांश गावांमध्ये ग्रामपंचायतींना चिंचेचे उत्पन्न मिळते. चिंच झाडाची सावली उन्हाळ्यात आरोग्यदायी गारवा देते. चिंचमध्ये सी व ए व्हिटॅमिन असते. चिंचेची सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब या समस्या कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी चिंचेच्या बिया उपयुक्त असतात. चिंचेचे मोठे झाड वर्षाकाठी पाच ते सहा हजार रुपये उत्पन्न देते.

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02174 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top