
पान ८
03532
कागल ः छत्रपती शाहू महाराज यांच्या चित्ररथाच्या स्वागत करताना नवीद मुश्रीफ, प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, प्रकाश गाडेकर, पोलीस निरीक्षक अजितकुमार जाधव आदी .
राजर्षी शाहू चित्ररथाचे
कागलमध्ये स्वागत
कागल, ता. १२ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व सुरु आहे. यानिमित्त त्यांच्या जीवन कार्याची माहिती देणारा चित्ररथ जिल्हयात फिरत आहे. गुरुवारी या चित्ररथाचे आगमन कागलमध्ये झाले. या चित्ररथाचे स्वागत येथील बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ केले. यावेळी प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, पोलीस निरीक्षक अजितकुमार जाधव यांच्या हस्ते चित्ररथाला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून या चित्ररथाची निर्मिती केली आहे. या चित्ररथाची बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यापासून खर्डेकर चौकातून मुख्य बाजारपेठेतून चित्ररथाची मिरवणूक काढली. याची सांगता गैबी चौकात झाली. या चित्ररथात छत्रपती शाहू महाराजांनी केलेले विविध प्रकल्प, संस्था व त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची ओळख या चित्ररथातून करून दिली.
यावेळी नितीन दिंडे, संजय ठाणेकर, इरफान मुजावर, सतीश घाडगे,अर्जुन नाईक, लियाकत मकानदार, मंडल अधिकारी कुलदिपक गवंडी, तलाठी दीपक लोहार, आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02189 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..