कागल : अखिल भारतीय ग्राहक पंचायत कागल तालुका कार्यकारिणीची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : अखिल भारतीय ग्राहक पंचायत कागल तालुका कार्यकारिणीची निवड
कागल : अखिल भारतीय ग्राहक पंचायत कागल तालुका कार्यकारिणीची निवड

कागल : अखिल भारतीय ग्राहक पंचायत कागल तालुका कार्यकारिणीची निवड

sakal_logo
By

02633
प्रज्ञा शोध परीक्षेत अन्वी जगताप राज्यात पहिली
पन्हाळा ः पन्हाळा विद्यामंदिची पहिलीची विद्यार्थिनी अन्वी अमित जगताप ही प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात पहिली आली. तिला १०० टक्के गुण मिळाले. सई संदीप सावंत जिल्ह्यात तिसरी आणि विराज सखाराम काशीद, जान्हवी रणजित पाटील, समर्थित अभिजित पाटील तालुक्यात पहिले आले. दुसरीची भार्गवी रोहित बांदिवडेकर जिल्ह्यात दुसरी आली. विद्यार्थ्यांना संस्थापक अक्षय लाड, शिक्षिका दीपा काशीद, सुप्रिया उरुणकर आणि संतोष शेटे यांचे मार्गदर्शन लाभले. कन्या व कुमार विद्यामंदिर मधील मराठी माध्यमाच्या पहिलीच्या मनस्वी मदन काशीद, स्वरा स्वप्नील काशीद आणि स्वरा शाम बाणकर या राज्यात पहिल्या आल्या. त्यांना रेखा महाजन, कविता कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.


बिद्रीत आज गिरणी कामगारांचा मेळावा
मुरगूड : बिद्री (ता. कागल) येथे साखर कारखान्याच्या कामगार भवनामध्ये उद्या (ता. २०) दुपारी २ वाजता गिरणी कामगारांचा मेळावा होणार आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मेळाव्याचे आयोजन केले असून कागल, राधानगरी व भुदरगड तालुक्यातील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. मेळाव्यामध्ये म्हाडा गिरणी कामगार लॉटरी या विषयावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई मार्गदर्शन करणार आहेत. ही माहिती संयोजक राजेंद्र कांबळे, बाबूराव यादव, स्वप्नील मोरबाळे, सर्जेराव वाडकर यांनी दिली.

02299
राजाराम शिंदे अध्यक्षपदी
गारगोटी : वाघापूर (ता. भुदरगड) येथील महालक्ष्मी विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी राजाराम देवाप्पा शिंदे यांची व उपाध्यक्षपदी रघुनाथ मारुती कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. एस. एस. पाटील यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. संस्थापक बाळासाहेब शिंदे, नारायण पाटील, धनाजी कुंभार, श्रीपती आरडे, अमृत कामिरकर, विलास कुंभार, मोहन एकल आदी उपस्थित होते. सचिव राजेंद्र खटांगळे यांनी आभार मानले.

विनयरावजी कोरे सेवा संस्था बिनविरोध
पन्हाळा ः पन्हाळा तालुक्यातील इंजोळे येथील विनयरावजी कोरे विकास सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. यात तानाजी कोंडे, चंद्रकांत गायकवाड, गणपती गायकवाड, वसंत पाटील, अशोक गवळी, कृष्णात पाटील, संदीप पाटील, तुकाराम पाटील, पार्वती पाटील, पार्वती बुराण, नरेश कांबळे, रामचंद्र पाटील यांची निवड झाली, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती एम. एस. कुंभार यांनी काम पाहिले.

02928
02927
व्यवस्थापन समितीचे बचाटे अध्यक्ष
पुनाळ : कोलोली (ता. पन्हाळा) येथील केंद्रशाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मनसेचे तालुकाध्यक्ष अमर गोविंद बचाटे व उपाध्यक्षपदी संदीप केरबा पाटील यांची निवड करण्यात आली.बहुसंख्य पालकांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. स्वागत संजय गावडे, प्रास्ताविक लक्ष्मण पोवार यांनी केले. अन्य सदस्य असे : तात्यासाहेब परीट, संजय सुतार, सौ. सविता माने, सौ. कोमल गुरव, सौ. शिल्पा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी सौ. जयश्री बचाटे, तज्‍ज्ञ शिक्षक शिक्षक जयसिंगराव गुरव, शिक्षक प्रतिनिधी अनिल आंगठेकर, सचिव लक्ष्मण पोवार. या वेळी सरपंच विश्वास चव्हाण, पी. आर. पाटील, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. आभार अजय दाभोळकर यांनी मानले.

तुरंबे येथे बालसंस्कार शिबिर
कसबा वाळवे ः हरवलेल्या संस्कारामुळे समाज भरकटतो आहे. नको ते आदर्श ठेवून तरुणाई दिशाहीन बनली आहे. जे जे चांगलं ते ते पायदळी तुडवले जात असताना चिमुकल्यांना चांगल्या संस्कारांची गरज ओळखून युवा कीर्तनकार ओंकार सूर्यवंशी यांनी सुरू केलेले बालसुसंस्कार आध्यात्मिक विद्या शिबिर समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध प्रवचनकार भानुदास महाराज यांनी केले. तुरंबे (ता. राधानगरी) येथे चालू केलेल्या बाल संस्कार आध्यात्मिक विद्या शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. सोपान सूर्यवंशी यांनी स्वागत केले. शिबिरात प्राणायाम, हरिपाठ, हनुमान चालिसा, भगद्‌गीता, विष्णुसहस्रनाम, पखवाज, तबला, हार्मोनियम, रामायण तसेच सामाजिक, धार्मिक विषयावर व्याख्याने आयोजित केली आहेत. निवासी शिबिरात ८० मुला-मुलींनी हजेरी लावलेली आहे.

अरुण कासार-22830
22831 शामराव करवळ
केदारलिंगच्या अध्यक्षपदी अरुण कासार
कडगाव : मडूर (ता. भुदरगड) येथील केदारलिंग विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी अरुण शामराव कासार यांची, तर उपाध्यक्षपदी शामराव केदारी करवळ यांची निवड झाली. या वेळी शशिकांत कासार, महादेव रेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळीही निवडणूक निर्णय अधिकारी सहायक निबंधक एस. एस. पाटील, माजी अध्यक्ष दशरथ रेगडे, मानसिंग पाटील, पांडुरंग कदम, मसणू कांबळे आदी उपस्थित होते. सचिव शिवाजी गोरे यांनी आभार मानले.

कागल तालुका कार्यकारिणी जाहीर
कागल : अखिल भारतीय ग्राहक पंचायत कागल तालुका कार्यकारिणीची निवड जिल्हाध्यक्षा ॲड. सौ. सुप्रिया युवराज दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कार्यकारणी अशी ः अध्यक्ष - दीपक खोत, संघटक - विशाल माळी, उपाध्यक्ष - पांडुरंग घाटगे, सचिव - विक्रांत कोरे, कोषाध्यक्ष - राजेंद्र पाटील, महिला आघाडी प्रमुख सौ. रेवती विकास बरकाळे, सदस्या सौ. सुनिता घाटगे, सदस्या - सौ. जयमाला संतोष पाटील. निवड पत्रावर ॲड. सौ.दळवी, जिल्हा संघटक जगन्नध जोशी यांच्या सह्या आहेत.