कागल : पुतळे अनावरण मुश्रीफ पत्रकार परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : पुतळे अनावरण मुश्रीफ पत्रकार परिषद
कागल : पुतळे अनावरण मुश्रीफ पत्रकार परिषद

कागल : पुतळे अनावरण मुश्रीफ पत्रकार परिषद

sakal_logo
By

26483
26485

महापुरुषांच्या पुतळ्यांचे
कागलात आज अनावरण
मंत्री हसन मुश्रीफ; उपमुख्यमंत्री पवार, पाटेकर यांची उपस्थिती
कागल, ता. ३ : शहरात महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या (ता. ४) होत आहे. यानंतर छत्रपती संभाजीराजे, राजर्षी शाहू महाराज, तसेच सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे, अजितसिंहराजे घाटगे यांचेही पुतळे उभारण्यात येणार आहेत. पुतळ्यांमुळे कागल पुतळ्यांचे शहर म्हणून उदयाला येईल. या महापुरुषांच्या पुतळ्यापासून भावी पिढीला प्रेरणा मिळत राहील, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या महापुरूषांच्या पुतळ्यांच्या अनावरण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सभास्थळाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘महापुरूषांच्या पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार व सिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, छत्रपती मालोजीराजे, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह जिल्ह्यातील नेते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ‘जागर समते’चा टॅगलाईनखाली करण्यात येत आहे. पावसाळ्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच राजर्षी शाहू महाराज पूर्णाकृती पुतळ्याचा कबुतरा बांधकाम शुभारंभ करण्यात येणार आहे. बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणखी मोठा करण्यात येणार आहे. तसेच सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे, अजितसिंह घाटगे यांच्या पुतळ्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी जागा निश्चित केली आहे.’’
जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, प्रकाश गाडेकर, प्रविण काळबर, विकास पाटील, सुनिल माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02235 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top