
कागल : अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्ता अभ्यासवर्ग
03687
कागल : अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्ता अभ्यास वर्गात बोलताना पोलिस निरीक्षक अजितकुमार जाधव. शेजारी ॲड. सुप्रिया दळवी, जगन्नाथ जोशी, एन. ए. कुलकर्णी आदी.
ग्राहक पंचायतीतर्फे कार्यकर्ता अभ्यास वर्ग
कागल, ता. २३ : अखिल भारतीय ग्राहक पंचायत कागल तालुका शाखेतर्फे तालुकास्तरीय कार्यकर्ता अभ्यास वर्ग झाला. उद्घाटन पोलिस निरीक्षक अजितकुमार जाधव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हाध्यक्षा ॲड. सुप्रिया दळवी होत्या. यावेळी जिल्हा संघटक जगन्नाथ जोशी, प्रांत कोषाध्यक्ष एन. ए. कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, महावितरण उपअभियंता विनोद घोलप प्रमुख उपस्थित होते.
जाधव म्हणाले की, ग्राहक पंचायतीच्या आवाजामुळे शोषितांना न्याय मिळणार आहे. कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे यांचे ‘शासकीय कृषी योजना’, प्रांत कोषाध्यक्ष एन. ए. कुलकर्णी यांचे ‘संघटन काळाची गरज’, वीज विषय समिती जिल्हाप्रमुख प्रशांत पुजारी यांनी ‘वीज ग्राहक’, प्रांत सचिव संदीप जंगम यांनी ‘कार्यकर्त्यांचे वर्तनशास्त्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. ॲड. दळवी, सचिव दत्तात्रय देवकाते यांनी मनोगत व्यक्त केले.
बंटी संकपाळ, तुषार भास्कर यांचा विशेष सत्कार झाला. ॲड. दळवी यांनी तालुका कार्यकारिणी जाहीर केली.
स्वागत योगेश कदम यांनी केले. यावेळी सुहास गुरव, शिवनाथ बियाणी, अनिल जाधव, दीपक खोत, विशाल माळी, पांडुरंग घाटगे, विक्रांत कोरे, सुनीता घाटगे, रेवती बरकाळे, राजेंद्र पाटील, आरिफ मुजावर, हिंदुराव पाटील, योगेश तिवले, एस. डी. पाटील, शोभा खोत, विजया भोसले, आरती कामटे, नंदकुमार कांबळे, योगिता घराळ, श्रावणी खोत, दीपाली खोत, जयमाला पाटील, अर्जना कोरवी, अश्विनी भोसले, दीपाली घोरपडे, तसेच विजयश्री निंबाळकर उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02275 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..