
कागल : ईद नमाज
कागल शहर परिसरात
बकरी ईद उत्साहात
कागल : कागल शहर आणि परिसरात आज बकरी ईद उत्साहात झाली. ईद उल फित्रनंतर सर्वात मोठा सण म्हणून या सणाकडे पाहिले जाते. तसेच कुर्बानीचा उत्सव म्हणूनही ‘बकरी ईद’ला मोठे महत्त्व आहे. ईदनिमित्त शहरातील शाहू मेमोरियल हॉलमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आले. मौलाना अकबर यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदची माहिती आणि ती साजरी करण्याचे महत्त्व विशद केले. तसेच नमाज पठणाची माहिती दिली. त्यानंतर सामूहिक नमाजपठण करण्यात आले. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. कागल पोलिस ठाणे आणि पालिकेच्यावतीने मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिला. माजी ग्रामविकास मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांना पोलिस निरीक्षक अजितकुमार जाधव यांच्यासह कार्यकर्ते, नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. नमाज पठणाकरिता शाहू मेमोरियल हॉलमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती.
Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02322 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..