कागल : मित्राने केली पाच लाखाची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : मित्राने केली पाच लाखाची चोरी
कागल : मित्राने केली पाच लाखाची चोरी

कागल : मित्राने केली पाच लाखाची चोरी

sakal_logo
By

पाहुणा म्हणून आला... दागिने घेऊन पळाला!
---
कागलमधील प्रकार; ५० हजार रोकडसह दागिन्यांचा समावेश
कागल, ता. १६ : पाहुणा बनून आलेल्या एका मित्राने ५० हजार रोकडसह पाच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. येथील सांगाव नाक्याजवळ ही घटना घडली. याबाबतची फिर्याद मल्लिकार्जुन काडाप्पा पाटील (मूळ कणंगला, ता. हुक्केरी) यांनी कागल पोलिसांत दिली. या प्रकरणी महेश बनकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मल्लिकार्जुन पाटील कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामाला आहेत. ते पत्नीसह येथील सांगाव नाक्याजवळ भाड्याच्या घरात राहतात. पाटील यांची कामाच्या ठिकाणी रामनगर (बंगळूर) येथील महेश बनकर याच्याशी ओळख झाली होती. यातून पाटील आणि बनकर यांच्यात मैत्री झाली. त्यामुळे पाटील यांच्या घरी बनकर याचे येणे-जाणे होते. रविवारी (ता. ३) बनकर कोल्हापूरला जाण्यासाठी कागल येथे आला होता. रात्री पाटील यांच्या घरी उतरला. पाटील यांनी घरातील आतल्या लहान खोलीत बनकर याची व्यवस्था केली होती. सकाळी तो कोल्हापूरला गेला. त्या दिवसानंतर बुधवारी (ता. १३) मल्लिकार्जुन पाटील आणि त्यांच्या पत्नी गोकाक धबधबा पाहण्यासाठी जात होते. गंठण घालण्यासाठी पाटील यांच्या पत्नीने लोखंडी तिजोरीचा कप्पा उघडला असता दागिने गायब झाल्याचे निदर्शनास आले. कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये चोरी झाल्याचेही लक्षात आले. बनकर यांना झोपण्यासाठी दिलेल्या खोलीत दागिने ठेवलेले लोखंडी कपाट आहे. त्याची चावीही कपाटाशेजारीच ठेवली जाते. त्यामुळे ही चोरी बनकर याने केल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी बनकर याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही. त्यामुळे मल्लिकार्जुन पाटील यांनी कागल पोलिस ठाण्यात बनकर याच्याविरोधात चोरीची फिर्याद दाखल केली. दहा दिवसांनंतर चोरी झाल्याचे लक्षात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02340 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..