
कागल : ओबीसी आरक्षण राष्ट्रवादीकडून साखर वाटप
03806
कागल : साखर वाटप करताना आमदार हसन मुश्रीफ व कार्यकर्ते.
हे महाविकास आघाडीचे यश
मुश्रीफ; ओबीसी आरक्षणाबद्दल राष्ट्रवादीतर्फे साखर वाटप
कागल, ता. २१ : तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी बांठीया आयोगाची नियुक्ती केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या आयोगाचा अहवाल मान्य करत ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. हा ओबीसी समाजातील जनतेचा विजय असून महाविकास आघाडीचे हे यश असल्याचे माजी ग्रामविकासमंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरात साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर हा कार्यक्रम झाला.
जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रमेश माळी, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, सौरभ पाटील, सतीश गाडीवड्ड, संजय चितारी, इरफान मुजावर, अस्लम मुजावर, नवाज मुश्रीफ उपस्थित होते.
चौकट
विरोधकांना चारीमुंड्या चित करू ...
न्यायालयाच्या निर्णयानंतर आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. नवीन सरकारकडून महाविकास आघाडीने मंजूर केलेली विकासकामे रद्द केली जात आहेत. आपण मंजूर केलेल्या कामांपैकी ९५ टक्के कामांची वर्क ऑर्डर निघाली आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. काही लोक आता बिळातून बाहेर पडत आहेत. त्यांचा विचार करण्याची गरज नाही. मलाही आता खूप वेळ आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये विरोधकांना चारीमुंड्या चित करू. यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02351 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..