कागल : प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी राजर्षी शाहूंचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी राजर्षी शाहूंचा जागर
कागल : प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी राजर्षी शाहूंचा जागर

कागल : प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी राजर्षी शाहूंचा जागर

sakal_logo
By

महिन्याच्या शेवटच्या रविवारी
राजर्षी शाहूंच्या कार्याचा जागर

कागल, ता. २६ : येथील वनमित्र संस्था, शिवराज्य मंच, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मी भारतीय आम्ही भारतीय, आदी संस्थांतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांतून राजर्षी शाहूंच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वर्षभर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी क्षेत्रभेटीसह विविध कार्यक्रम करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून नुकताच पडसाळी ते मुडागड ट्रेक केला.
शिरोळमधील शाहूकालीन ऐतिहासिक घोड्याची पागा, कल्लेश्वर तलाव, शाहूकालीन कचेरी, उदगाव येथील रामलिंग मंदिर, नदीवरील शाहू महाराज यांनी बांधलेला पूल व ऐतिहासिक रेल्वे स्टेशन, तसेच जयसिंगपूर येथील ऐतिहासिक राणी साहेबांच्या वाड्यास भेट दिली. येथील बाजारपेठेत असणाऱ्या राजर्षी शाहू यांचे जनक वडील कै. जयसिंगराव घाटगे यांच्या व राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राजर्षी शाहू महाराज यांचे पुत्र प्रिन्स शिवाजी यांचा जेथे अपघाती मृत्यू (शिकारीसाठी गेले असताना) झाला होता त्या शिवपूरला त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. पुढे श्रीक्षेत्र रामलिंग येथे छत्रपती राजर्षी शाहू शिकारीसाठी जात होते, तेथे भेट देऊन सदर यात्रेची सांगता झाली. जुलैत पडसाळी येथे शाहू स्मारकाला भेट व स्वच्छता मोहीम, पडसाळी ते मुडागड पायी प्रवास करत तत्कालिन हत्ती पैदास केंद्राच्या ठिकाणाला भेट उपक्रम झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02367 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..