कागल : पोक्सो अंतर्गत दोघांच्या विरोधात गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : पोक्सो अंतर्गत दोघांच्या विरोधात गुन्हा
कागल : पोक्सो अंतर्गत दोघांच्या विरोधात गुन्हा

कागल : पोक्सो अंतर्गत दोघांच्या विरोधात गुन्हा

sakal_logo
By

महिलेसह तरुणावर
पोक्सोंतर्गत गुन्हा
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
कागल, ता. २७ : बाल लैंगिक अत्याचार कायद्याखाली (पोक्सो) प्रकरणी पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील महिलेसह कागलच्या तरुणाच्या विरोधात कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता महिलेला तीन तर तरुणाला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
एका अल्पवयीन युवतीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी कागल पोलिसांत गुन्हा नोंद आहे. या प्रकरणी पोलिसांनी पिंपळगाव खुर्द येथील संगीता रंगराव आकुर्डे आणि येथील शाहू वसाहतीतील प्रवीण शिवाजी कुरणे यांना अटक केली. त्यांच्यावर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्रवीण कुरणे याला २५ जुलैला तर संगीता आकुर्डे यांना २६ जुलैला अटक केली आहे. संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित युवतीला १५ जुलैला फूस लावून पळवून नेले होते. तसेच दोन वर्षांपासून संशयित पीडितेला त्रास देत असल्याचे पोलिसांतून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02368 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top