कागल : राजे समरजितसिंह घाटगे प्रसिध्दा पत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : राजे समरजितसिंह घाटगे प्रसिध्दा पत्रक
कागल : राजे समरजितसिंह घाटगे प्रसिध्दा पत्रक

कागल : राजे समरजितसिंह घाटगे प्रसिध्दा पत्रक

sakal_logo
By

‘प्रोत्साहन’चा कळवळा
म्हणजे.... उलट्या बोंबा
समरजितसिंह घाटगे; माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला
कागल, ता. १ : प्रोत्साहन अनुदानाबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांचा कळवळा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय. सत्तेतून बाहेर गेल्यानंतर जिल्हा बँकेमार्फत ठराव करणे म्हणजे अडीच वर्षे झोपा काढल्या का, सरकारमध्ये असताना जिल्हा बँकेत असा ठराव केला असता, तर त्यांचा शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा लक्षात आला असता, असा टोला समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकाद्वारे लगावला.
पत्रकात म्हटले आहे, अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. सरकारने प्रामाणिक शेतकऱ्यांना तीन वेळा अनुदान जाहीर केले. अनुदान जाहीर करून अनेक जाचक अटी घातल्या. या निकष प्रक्रियेमध्ये माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ आघाडीवर होते. त्या वेळी अनुदानापासून कोरोनामुळे १२ हजार ८८ शेतकरी वंचित राहणार आहेत, याचा साक्षात्कार झाला नाही का. अनेक अटी व शर्ती लावत प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले. विनाअट अनुदान देण्यासाठी मंत्रिमंडळात किती वेळा आवाज उठवला.
सरकार बदलल्यानंतर त्यांनी दिखाव्यासाठीच हा जिल्हा बँकेचा ठराव केला आहे. आमदार मुश्रीफ आत्ता पाठपुरावा करणार म्हणतात, ते धांदात लोकांची दिशाभूल करतात.

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02385 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..