कागल : पोलिस असल्याची बतावणी करून महिलेकडील ७ तोळ्याचे दागिने लांबविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : पोलिस असल्याची बतावणी करून महिलेकडील ७ तोळ्याचे दागिने लांबविले
कागल : पोलिस असल्याची बतावणी करून महिलेकडील ७ तोळ्याचे दागिने लांबविले

कागल : पोलिस असल्याची बतावणी करून महिलेकडील ७ तोळ्याचे दागिने लांबविले

sakal_logo
By

पोलिसाच्या बहाण्याने
७ तोळे दागिने पळविले
कसबा सांगावात प्रकार; दोघा भामट्यांवर गुन्हा

कागल, ता. १६ : पोलिस असल्याची बतावणी करून कसबा सांगाव (ता. कागल) येथील वृद्धेचे ७ तोळ्यांचे ३ लाख १५ हजार रुपयांचे दागिने दोन भामट्यांनी पळविले. याप्रकरणी कागल पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. श्रीमती मालूताई भोपाल चौगुले (वय ७५, चावडी गल्ली कसबा सांगाव) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
आज दुपारी तीनच्या सुमारास मालूताई भोपाल चौगुले यांच्या सोसायटी चौकातील पानपट्टीसमोर संशयित आला. त्याने आपण पोलिस असल्याची बतावणी करून चावरे यांच्या घरात दागिन्यांची चोरी झाल्याचे सांगितले. आपले दागिने काढून ठेवा, असे सांगत चौगुले यांना विश्वासात घेतले. अंगावरील दागिने काढून आपल्याकडे देण्यास भाग पाडले व भामट्यांनी तेथून पळ काढला.
यामध्ये मालूताई चौगुले यांच्या १ लाख ८० हजार रुपयांच्या प्रत्येकी २० ग्रॅमच्या दोन पाटल्या, १ लाख ३५ हजारांचे ३ तोळ्याचे कंठीमाळ असे एकूण ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे ७ तोळ्याचे दागिने घेऊन भामट्यांनी पोबारा केला. भर दुपारी घडलेल्या घटनेने महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे . याबाबतचा अधिक तपास उपनिरीक्षक रविकांत गच्चे हे करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02434 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..