कागल : टेंबे स्वामी जयंती उत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : टेंबे स्वामी जयंती उत्सव उत्साहात
कागल : टेंबे स्वामी जयंती उत्सव उत्साहात

कागल : टेंबे स्वामी जयंती उत्सव उत्साहात

sakal_logo
By

१५४७
डॉ. बी. डी. आजळकर
हलकर्णी महाविद्यालयाच्या
प्राचार्यपदी डॉ. आजळकर
चंदगड ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. बी. डी. आजळकर यांची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी (ता. १८) त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्रा. पी. ए. पाटील, राजकुमार पाटील, अधीक्षक प्रशांत शेंडे, डॉ. आय. आर. जरळी, प्रा. डॉ. आर. ए. घोरपडे, प्रा. ए. एस. बागवान, प्रा. ए. एस. जाधव आदींनी डॉ. आजळकर यांचे स्वागत केले. आजळकर यांनी गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात दीर्घकाळ रसायनशास्त्र विषयाचे अधिव्याख्याता म्हणून काम केले आहे.

३०४०
मौनी महाराज मंदिरात सभागृह लोकार्पण
उत्तूर ः येथील मौनी महाराज मंदिरातील मंडप सभागृहाचा लोकार्पण सोहळा झाला. जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे यांच्या निधीतून मंडप उभारला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने कार्यक्रम झाला. श्रीकांत मांगले यांनी स्वागत केले. उमेश आपटे व सरपंच वैशाली आपटे यांचा सत्कार पांडुरंग जाधव व शेवंता बुवा यांच्या हस्ते झाला. ग्रामपंचायत सदस्या मयुरी आमनगी शिवलिंग सन्ने, माजी उपसरपंच महेश करंबळी उपस्थित होते. सुरेश राजाराम यांनी आभार मानले.

कळेत मंगळवारी आरोग्य रक्षण मेळावा
पुनाळ ः काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील बाबा रेडीकर गो-गीता सेवा संस्थेच्या वतीने शेती, पर्यावरण, आरोग्य रक्षण मेळावा मंगळवारी (ता. २३) आयोजित आला आहे. निरनिराळ्या असाध्य रोगांमुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.त्यामुळे हा मेळावा आयोजिला आहे. कळे येथील माणिक मल्टिपर्पज हॉलमध्ये दुपारी एक वाजता मेळावा होणार आहे. आमदार विनय कोरे अध्यक्ष आहेत. पंचगव्य गुरुकुल विद्यापीठ चेन्नईचे निरंजनभाई वर्मा मार्गदर्शन करणार आहेत. सरपंच रवींद्र पाटील, अॅड. प्रकाश देसाई, सर्जेराव आर. पाटील, आबा कांबळे यांची उपस्थिती आहे. मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा आनंदी कांबळे, उपाध्यक्ष नारायण पाटील, अॅड. प्रमिला कांबळे, गणपती पाटील, रमाकांत कांबळे, नामानंद कांबळे यांनी केले आहे.

02646
कळेत विश्‍व हिंदू परिषदेचा वर्धापन दिन
कळे : हिंदू समाजाला संघटित करून स्वाभिमान जागवण्याचे महान कार्य विश्व हिंदू परिषदेने केले आहे. अस्पृश्यता संपवून हिंदू धर्मातील दरी कमी करण्याचे संघटनेचे काम उल्लेखनीय आहे.’ असे प्रतिपादन पन्हाळा तालुकाप्रमुख सुरेश पोवार यांनी केले. येथे विश्व हिंदू परिषदेच्या वर्धापन दिनी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. फलक पूजन झाले, दूध वाटप, असा कार्यक्रम झाला. गोरक्षक दलाचे अध्यक्ष तुकाराम मांडवकर यांनी प्रास्ताविक केले. अक्षय बेलेकर, सूरज पाटील, सुमित पाटील, निलेश बेलेकर, भाऊ देसाई, अमोल नाईक, राजू कोकणे, सौरभ पाटील, विघ्नेश पाटील, दिलीप चौगले आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

00524
वक्तृत्व स्पर्धेत घाटगे, इंजर प्रथम
असळज : गगनबावडा येथील मुरलीधर वाचन मंदिराच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात समृद्धी घाटगे तर मोठ्या गटात श्रावणी इंजर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदवला. अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक व्ही. एम. पाटील होते. निकाल असा ः लहान गट-(पहिली ते चौथी)- समृद्धी संदीप घाटगे, आदर्श मोरे, वेदांत शिंदे, अक्षदा धोरणे. मध्यम गट- (पाचवी ते सातवी)- ज्ञानेश्वरी रमेश ‌खुटाळे, प्रणाली संतोष प्रभू, प्रतिक प्रकाश खेतल, अथर्व आबासाहेब बिक्कड. मोठा गट (आठवी ते दहावी) श्रावणी महादेव इंजर, शुभम युवराज हाप्पे, रोहन भगवान भुतल, तन्वी अशोक वरेकर. परीक्षण वैदेही पाध्ये, प्रणाली सावंत यांनी केले. संस्थेच्या अध्यक्षा विद्या कोठावळे, सोमप्रकाश माळी, अभय बोभाटे, वृंदा पाध्ये, यशवंत गुरव, रवि पारधी, रामचंद्र कुपले, आबासाहेब बिक्कड, संताजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्या अरुणा पोतदार, नेहा पाटील आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यवाहक आर. एस. साधले तर सु. द. सावंत यांनी आभार मानले.

01735
बोरपाडळे शाळेस शैक्षणिक साहित्य
बोरपाडळे : श्री भैरव विकास सेवा सोसायटी आणि भैरव रास्त धान्य दुकान यांच्या संयुक्त विद्या मंदिर बोरपाडळे या प्राथमिक शाळेला शैक्षणिक वह्या, पेनचे वितरण केले. संस्थाध्यक्ष अतुल उर्फ बंडा पाटील, स्वप्नील माने-पाटील, सुदीप पाटील, सौरभ निकम, दिनकर गराडे, संदीप पाटील, प्रकाश कणेरकर, अमोल खडके, अशोक पाटील, संजय जाधव आदी उपस्थित होते. अनिल मोरे यांनी आभार मानले.


00520
‘सह्यगिरी’तर्फे गरजूंना शैक्षणिक साहित्य
असळज : सह्यगिरी संस्थेमार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. देणगीदारांच्या साथीने १० निवडक विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य देऊन शैक्षणिक हातभार दिला. देणगीदारांच्या मदतीतून बारा विद्यार्थिनींना वर्षभराचा खर्च धनादेश स्वरूपात तर दहा मुलींना सायकली व शंभर मुलांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. कोलिक, पडसाळी, पळसंबे, निगडेवाडी, असंडोली, निवडे, वेतवडे, मांडूकली, मणदूर, कोदे बुद्रुक येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक हातभार दिला.

00518
अध्यक्षपदी जयसिंग पडवळ
असळज : खोपडेवाडीतील जय भवानी तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी जयसिंग पडवळ यांची तर उपाध्यक्षपदी संजय पडवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या मंडळाने यांनी गेली वीस वर्षे एक गाव एक गणपती परंपरा जपली आहे. रामकृष्ण पडवळ, विजय पडवळ, दादू केसरकर, यशवंत पडवळ, धोंडीराम चौगले, अजित भोसले, अनिल पडवळ, वैभव पडवळ, दीपक पडवळ, सचिन आंबेकर व तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आभार आनंदा पडवळ यांनी मानले.

तारळे खुर्दला माजी सैनिकांचा सत्कार
कसबा तारळे : केंद्र शाळा तारळे खुर्द येथे माजी सैनिकाचा सत्कार झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. वाय. पाटील होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नेताजीराव चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. मेजर पंडित पाटील, यशवंत पाटील, तानाजी पाटील, मोहन पाटील, उत्तम पाटील या माजी सैनिकांचा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. प्रीती घुले यांचा कोरोना काळात कर्तव्य बजावल्याबाबत सत्कार केला. उपाध्यक्षा भोसले, निवास चौगले, प्रदीप पाटील, विक्रम सरावने, सावंत, विद्या पाटील, शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वंदना कांबळे, आशा वर्कर्स उपस्थित होत्या. स्वागत एस. वाय. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जाधव यानी केले. आभार श्री. पोवार यांनी मानले.

कागलमध्ये टेंबे स्वामी जयंती उत्सव
कागल : गुरु वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी ) जयंती उत्सव साजरा झाला. अधिष्ठान मानस पूजा, गुप्त स्मरण दान, आर्त लीन आरती, महाप्रसाद व सुश्राव्य भजन आदी कार्यक्रम झाले. विजय भाऊ गुरुदास यांचा सत्कार सोहळा आईसाहेब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल पाटील यांच्या हस्ते झाला. मगर मठी संभाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ व आईसाहेब फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02441 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..