कागल : माने महाविद्यालयातील ई पिक नोंदणी मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : माने महाविद्यालयातील ई पिक नोंदणी मार्गदर्शन
कागल : माने महाविद्यालयातील ई पिक नोंदणी मार्गदर्शन

कागल : माने महाविद्यालयातील ई पिक नोंदणी मार्गदर्शन

sakal_logo
By

माने महाविद्यालयात ई पीक नोंदणी मार्गदर्शन
कागल ः येथील महसूल विभाग व डी. आर. माने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ई पीक पाहणी व नोंदणी ॲप व्हर्जन २ (online पीक पाणी नोंदणी) याचे मार्गदर्शन स्वयंसेवक व विद्यार्थ्यांना केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडल अधिकारी कुलदिपक गवंडी तसेच तलाठी दीपक लोहार उपस्थित होते. विद्यार्थ्यांकडून ई पीक पाहणीचे ॲप डाउनलोड करून पिकांची नोंदणी तसेच झाडे, विहीर, घर, पडीक जमीन आदी घटकांची नोंदणी कशी करता येते याबाबत मार्गदर्शन केले. एस. एन. तेली यांनी स्वागत केले. जी. एन. भोसले यांनी आभार मानले. प्रा. अमर रजपूत यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

३०५६
कोदवडे येथे वृक्षारोपण
राशिवडे बुद्रुक : वीरभद्र ट्रस्टचा वृक्ष संवर्धनाचा उपक्रम समाजाला दिशा देईल, असे प्रतिपादन रॅडिएंट ॲकॅडमीचे संस्थापक मुख्याध्यापक आर. जी. पाटील यांनी केले. ट्रस्टतर्फे वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते. माजगाव (ता. राधानगरी) येथील वीरभद्र ट्रस्टने कोदवडे येथील श्रीमान छत्रपती संस्थेच्या रॅडिएंट ॲकॅडमीच्या परिसरात विविध फळझाडांचे वृक्षारोपण केले. संस्थापक रामचंद्र कृष्णा कांबळे, भूषण कांबळे व शिवाजी कांबळे यांनी देशी झाडे दिली. पत्रकार प्रवीण ढोणे, सागर धुंदरे, अमर मगदूम व राजू पाटील यांच्या हस्ते पाहुण्यांचे सत्कार झाला. गणपती पाटील, अजित सरवळकर, संतोष डोंगळे, वीरेंद्र पाटील, शैलेश पाटील, अशोक पाटील, सूरज पाटील आदी उपस्थित होते.

१५४५
सुतार यांच्याकडून सुरुते शाळेला संगणक
चंदगड ः सुरुते (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेला शिक्षक शशिकांत सुतार यांनी संगणक प्रदान केला. विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानाचा लाभ घेता यावा यासाठी आपण हा संगणक प्रदान करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरमू आपटेकर, उपाध्यक्ष अवधूत भुजबळ, सदस्य शाम पाटील, मनोहर पाटील, भुजंग चौगुले यांनी तो स्वीकारला. आपटेकर यांनी सुतार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. अजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बेकवाडकर यांनी आभार मानले.

१७२८
अंनिसतर्फे बांबवडेत निदर्शने
बांबवडे ः ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिस चौकीसमोर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव प्रा. शिवाप्पा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनामध्ये प्रा. प्रकाश नाईक, प्रा. निलेश घोलप, प्रा. प्रदीप चरणकर, धनाजी सकटे, मुकुंद पाटील, चेतन पाटील, सुमित नाईक, प्रकाश डोंगरे, संजय कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

44082
कोरिवडे शाळेत साहित्याचे वाटप
आजरा ः कोरिवडे (ता. आजरा) येथील प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग कळेकर यांनी आई शांताई कळेकर व वडील शंकर कळेकर यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. येथील नितेश मिसाळे यांनीही आर्थिक मदत दिली. सरपंच रेश्मा पाटील, उपसरपंच दता पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव पाटील, उपाध्यक्ष संपदा कांबळे, दिगंबर पाटील, संतोष पाटील, राजाराम पाटील, सयाजी नार्वेकर, सुषमा पाटील, तृप्ती पाटील, सारिका पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. शिक्षक विजय कांबळे यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक एम. पी. देसाई यांनी प्रास्ताविक केले. शहानवाज मुल्ला यांनी आभार मानले.

रोटरीतर्फे शनिवारी कराओके स्पर्धा
नागाव : रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूरमार्फत खुल्या गटातील कराओके स्पर्धेचे आयोजन केले आहे. नवोदित गायकांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे रोटेरीयन बाळासाहेब कडोलकर व मानसिंग पानसकर यांनी सांगितले. प्रथम क्रमांकासाठी दहा हजार, द्वितीय पाच हजार व तृतीय क्रमांकासाठी तीन हजारांचे बक्षीस आहे. रोटेरीयन हेमंत दुखंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. शनिवारी (ता. २७) सकाळी दहा वाजता रोटरी समाज सेवा केंद्रात स्पर्धा होणार आहेत. रोटेरीयन राजू जोशी यांना मुखडा किंवा अंतरा गायलेली व्हिडिओ क्लिप पाठवावी असे आवाहन केले आहे.