पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

04113
सैफअली मुनीर हाज्जूखान
04112
आनंदा पाटील
---

दोन वेगवेगळ्या अपघातात
कागल तालुक्यातील दोघे ठार
----------------------
बुगटेआलूर येथे चारचाकी उलटली

कागल/ म्हाकवे, ता. २० : दोन वेगवेगळ्या अपघातात कागल तालुक्यातील दोघे जण ठार झाले. आज पहाटे साडेचार वाजता गोवा रोडवर बुगटेआलूर येथे चारचाकी उलटून झालेल्या अपघातात सैफअली मुनीर हाज्जूखान
(वय २४ , कागल) हा तरुण ठार झाला, तर सहा जण किरकोळ जखमी झाले. दुसऱ्या अपघातात म्हाकवे-गोरंबे रस्त्यावर मोटारसायकल व मोटार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात म्हाकवे (ता. कागल) येथील आनंदा महादेव पाटील (वय ५०) हे जागीच ठार झाले, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
येथील हाज्जूखान याने हॉटेल मॅनेजमेंट पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. तो व त्याचे मित्र कतारमध्ये ४० दिवसांच्या फिफा विश्वचषकामध्ये कुक म्हणून कामासाठी जाणार होते. त्यासाठी आवश्यक असल्याले वैद्यकीय प्रमाणपत्रासाठीच्या वैद्यकीय तपासणीसाठी गोव्याला चालले होते. त्याच्यासोबत कागल, बाचणी, निपाणी आणि कोल्हापूरमधील सहा जण होते. मित्राच्या चारचाकीने ते जात होते. पहाटे साडेचार वाजता स्तवनिधी (तवंदी) -गोवा रोडवरील बुगटेआलूर येथील वळणावर चारचाकी उलटली. या अपघातात सैफअलीचा जागीच मृत्यू झाला, तर गाडीतील सहा जण किरकोळ जखमी झाले. निहाल सांगावकर, यश साबळे (निपाणी),
अमन शेख (कोल्हापूर), ॲलिस्टर परेरा, स्टिफन परेरा (बाचणी), नदीम नाईकवडी अशी त्यांची नावे आहेत. सैफअलीच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
--
मोटार-मोटारसायकलीची
म्हाकवेजवळ धडक
म्हाकवे (ता. कागल) येथील बाळासो बाबूराव पाटील, दयानंद सिद्राम पाटील व आनंदा महादेव पाटील हे तिघेजण मोटारसायकल (एम एच ०९ एफपी ८८२७) वरून गोरंबेकडे जात होते, तर मोटार (एम एच ०९ ई के ७००२) गोरंबेकडून म्हाकवेकडे येत होती. म्हाकवेजवळील रोप्याच्या ओढ्याजवळ मोटारसायकल व मोटार यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. यात आनंदा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर बाळासो पाटील, दयानंद पाटील यांच्या पायाला मोठ्या प्रमाणात मार लागला. या दोघांची प्रकृती गंभीर आहे. दोन्ही गाड्यांची धडक एवढी जोरात होती की धडक बसल्यानंतर मोटार ५० फूट पुढे गेली होती. मोटारसायकल गाडीचा चक्काचूर झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02527 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..