कागल : बेपता अल्पवयीन मुलगी गडचिरोलीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : बेपता अल्पवयीन मुलगी गडचिरोलीत
कागल : बेपता अल्पवयीन मुलगी गडचिरोलीत

कागल : बेपता अल्पवयीन मुलगी गडचिरोलीत

sakal_logo
By

बेपत्ता अल्पवयीन
मुलगी गडचिरोलीत
कागल, ता. २१ : कागल तालुक्यातील १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी दोन दिवसांपूर्वी बेपता झाली होती. आज ती गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजल्याने कागल पोलिसांचे पथक तिला ताब्यात घेण्यासाठी गडचिरोलीला गेले आहे. संबंधित अल्पवयीन मुलगी मैत्रिणीच्या घरातून अभ्यास घेऊन येते, असे सांगून सोमवारी (ता. १९) सायंकाळी घरातून निघून गेली. तिची शोधाशोध करूनही ती मिळून न आल्याने पालकांनी तक्रार नोंदवली होती.
ती मुलगी गडचिरोली येथे बसस्थानकावर पोहोचल्यावर तेथील विक्रेत्याने व एका शिक्षकाने तिला गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आज ती गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात असल्याचा निरोप कागल पोलिसांना आला. मुलीला आणण्यासाठी महिला उपनिरीक्षक, हवालदार व महिला पोलिस असे पथक रवाना झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02531 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..