कुरणे वसाहत राज्यातील पहिली नियमित झोपडपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरणे वसाहत राज्यातील पहिली नियमित झोपडपट्टी
कुरणे वसाहत राज्यातील पहिली नियमित झोपडपट्टी

कुरणे वसाहत राज्यातील पहिली नियमित झोपडपट्टी

sakal_logo
By

04131
कागल : कुरणे वसाहतीतील झोपडपट्टीधारकांना मालकीपत्रे आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या वेळी भय्या माने, प्रकाशराव गाडेकर, प्रवीण काळबर, संदीप भुरले, विवेक लोटे, नवल बोते आदी.

कुरणे वसाहत राज्यातील
पहिली नियमित झोपडपट्टी
---
कागलमधील ५४ लाभर्थ्यांना मिळाली मालकीपत्रे
कागल, ता. २४ : आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शहरातील कुरणे वसाहतीतील ५४ झोपडपट्टीधारकांना हक्काची मालकीपत्रे मिळाली. नियमितीकरण झालेली कुरणे वसाहत ही राज्यातील पहिलीच झोपडपट्टी ठरली आहे. या वसाहतीच्या नियमितीकरणासाठी आमदार हसन मुश्रीफ व नगरसेवक सतीश घाडगे यांनी पाठपुरावा केल्याची भावना झोपडपट्टीधारकांनी व्यक्त केली. या वेळी झोपडपट्टीधारकांच्या हस्ते आमदार हसन मुश्रीफ यांचा सत्कार झाला.
कागल-मुरगूड मार्गावरील वडवाडी येथील कुरणे वसाहतीत झोपड्या आहेत. त्यांच्या नियमितीकरणाचा प्रश्‍न प्रलंबित होता. या नियमितीकरणामुळे झोपड्या उभारलेल्या ५४ झोपडपट्टीधारकांना याचा लाभ झाला. आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘घटस्थापनेदिवशी ५४ झोपडपट्टीधारकांच्या स्वमालकीच्या हक्काच्या घरात देवतांची प्रतिष्ठापना होणार आहे, याचे समाधान आहे. शहरातील राजीव गांधी वसाहत, बिरदेव वसाहत, रेल्वेलाइन वसाहत, स्मशानभूमी लाइन वसाहत, सांगाव नाका मातंग वसाहत, पसारेवाडी वसाहत या झोपडपट्ट्या नियमितीकरणासाठी प्रयत्नशील आहे.’’
या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नवल बोते, सतीश घाटगे, प्रवीण काळबर, विवेक लोटे, संदीप भुरले, संजय चितारी, भरत सोनटक्के आदी उपस्थित होते.
-------------
कोट
या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आतापर्यंत दहा ते बारा बैठका झाल्या आहेत. आमदार हसन मुश्रीफ व नगरसेवक सतीश घाडगे यांच्या पाठपुराव्यामुळे झोपडपट्टीधारकांचा हा प्रश्‍न कायमचा निकालात निघाला.
- प्रताप ऊर्फ भय्या माने, संचालक, जिल्हा बँक