कागल : शाहू कृषी संघाची ४० वी वार्षिक सभा संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : शाहू कृषी संघाची ४० वी वार्षिक सभा संपन्न
कागल : शाहू कृषी संघाची ४० वी वार्षिक सभा संपन्न

कागल : शाहू कृषी संघाची ४० वी वार्षिक सभा संपन्न

sakal_logo
By

04161
कागल : येथील शाहू कृषी संघाची ४० व्या वार्षिक सभेत बोलताना समरजितसिंह घाटगे. शेजारी नवोदिता घाटगे व इतर.

सेंद्रिय खते शेतकऱ्यांना
वाजवी दरात देणारः घाटगे

शाहू कृषी संघाची ४० वी वार्षिक सभा

कागल, ता.३० : येथील श्री छत्रपती शाहू कृषी सहकारी खरेदी विक्री सोसायटीची घोडदौड प्रगतीपथावर आहे. या संघामार्फत उत्कृष्ट दर्जाचे रासायनिक व सेंद्रिय खते सर्वसामान्य शेतकऱ्यांना व सभासदांना वाजवी दरात पुरवठा करणार असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.
संघाच्या ४० व्या वार्षिक सभेत ते बोलत होते.
घाटगे म्हणाले, सभासद, शेतकऱ्यांना चांगली सेवा देणेच्या हेतूने शाहू कारखाण्या मार्फत निर्माण केले जाणारे ''शाहू पोटॅश व सेंद्रिय खते'' शाहु कृषी संघाच्या शाखे मार्फत वितरित करण्यात येणार आहेत. खत विक्रीचे टार्गेट १५ कोटीपर्यंत वाढविण्याचा व त्यासाठी आवश्यक तेथे संघाच्या शाखा वाढविण्याबाबत संचालक मंडळ विचाराधीन आहे.
अध्यक्ष अनंत फर्नांडिस यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या कार्याध्यक्ष नवोदिता घाटगे यांच्या संकल्पनेतून संघामार्फत सुरू केलेला ''कागल बाजार'' चांगला चालला असून, तो नफ्यात आला आहे. संघाच्या प्रगतीच्यादृष्टीने या चांगल्या सुचनेबद्धल सौ. घाटगे यांचा सत्कार करण्यात आला.
विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक समीर नाळे यांनी केले. स्वागत उपाध्यक्ष अरुण शिंत्रे यांनी केले. आभार संचालक रामचंद्र वैराट यांनी मानले.