कागल : नागणवाडी प्रकल्प - मुश्रीफ खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : नागणवाडी प्रकल्प - मुश्रीफ खुलासा
कागल : नागणवाडी प्रकल्प - मुश्रीफ खुलासा

कागल : नागणवाडी प्रकल्प - मुश्रीफ खुलासा

sakal_logo
By

सगळे मीच केल्याची टिमकी
वाजविणे योग्य नाहीः मुश्रीफ

कागल, ता. १ : नागणवाडी प्रकल्प पाणीपूजन कार्यक्रमासंदर्भात माझा फोन झाल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी मान्य केले होते. त्यांना मी ‘आपण सगळ्यांनी मिळून पाणी पूजन करूया,’ असे सांगितले होते. मी फोन करूनही आबिटकर यांनी कार्यक्रम का घेतला, याचे आश्चर्य वाटते. तुम्ही या मतदारसंघाचे आमदार आहात. तुम्ही कार्यक्रम केलात. या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात माझ्या तालुक्यातील तीन गावे येत होती, म्हणून आम्हीही पाणी पूजन केले आहे. तुमचं नाव काढलं नाही की, टीका केली नाही, तरी तुम्हाला का झोंबले व खुलासा करण्याची का वेळ यावी? महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर तुम्ही अडीच वर्षांमध्ये प्रयत्न केले होते, याची मला जाणीव होती. मी २२ वर्षांपासून प्रयत्न करत आहे. मात्र अशा पद्धतीने कार्यक्रम करणे व सगळे मीच केले, अशी टिमकी वाजविणे योग्य नाही, असे मत आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, १९९९ ला मी आमदार झालो, त्यावेळी चिकोत्रा धरणाचे काम सुरू झाले होते. हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी होती. निधी उपलब्ध करणे आणि ते काम पूर्ण करणे हे माझ्या काळात झाले. २००१ मध्ये तत्कालीन कृष्णा खोरे पाटबंधारे मंत्री अजित पवार यांच्या हस्ते चिकोत्रा धरणातील पाण्याचे पूजन केले. त्यानंतर नागणवाडी प्रकल्पाच्या कामासाठी १२ कोटी ९३ लाख रुपये त्या वेळी मंजूर झाले. त्यावेळी मी आमदार होतो. त्या कामाचा प्रारंभ माझ्या हस्ते झाला होता. हा प्रकल्प बावीस वर्षे रखडला, याचे खरे कारण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हे होते.