कागल : ( सुधारित)दोघांना मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : ( सुधारित)दोघांना मारहाण
कागल : ( सुधारित)दोघांना मारहाण

कागल : ( सुधारित)दोघांना मारहाण

sakal_logo
By

कागलमध्ये दोघांना मारहाण
कागल, ता. ६ : येथील रत्ना मेडिकलजवळ मंगळवारी रात्री दोघांना मारहाण झाल्याची घटना घडली. अमन रियाज शेख (वय २१, रा. शाहू कॉलनी, कागल) व विश्‍वजित संतोष सुतार (२०, रा. कसबा सांगाव) असे मारहाण झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अमन शेख याने कागल पोलिसांत दिली असून त्याने स्वतःच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन या मारहाणीत चोरीला गेल्याचेही म्हटले आहे. आहे. याप्रकरणी नीलेश रवींद्र पाटील, आफताब शौकत जमादार, अजित अमोल नाईक, विश्‍वजित नंदकुमार डुबल (सर्व रा. कागल) यांच्याविरोधात कागल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे करीत आहेत.