कागल : मारामारी - ९ जणांना अटकपूर्व जामीन मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : मारामारी - ९ जणांना अटकपूर्व जामीन मंजूर
कागल : मारामारी - ९ जणांना अटकपूर्व जामीन मंजूर

कागल : मारामारी - ९ जणांना अटकपूर्व जामीन मंजूर

sakal_logo
By

माजी नगराध्यक्ष गाडेकरांसह
नऊजणांचा जामीन मंजूर

कागल, ता. ६ : कागल शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांत मंगळवारी (ता. २७) मारामारी झाली होती. या प्रकरणी दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्यासह नऊजणांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. आज त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला. मात्र, राष्ट्रवादीचे तिघेजण कागल पोलिस ठाण्यात हजर झाले होते. या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अद्याप त्यांचा जामीन अर्ज मंजूर झालेला नाही.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे यांच्यासह दहाजणांच्या विरोधात जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. या सर्वांनीही सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. मात्र, त्यांचा निर्णय आज झाला नाही. हा निर्णय १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.