कागल : नवीद मुश्रीफ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : नवीद मुश्रीफ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
कागल : नवीद मुश्रीफ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

कागल : नवीद मुश्रीफ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

sakal_logo
By

04199
कागल : नवीद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त धान्य वाटप करताना कार्यकर्ते

नवीद मुश्रीफ यांचा वाढदिवस
सामाजिक उपक्रमांनी साजरा

कागल, ता. ९ : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला.
स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी मतिमंद विद्यालयात अत्यावश्यक साहित्य, शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य वाटप केले. मतिमंद मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला. राजे दिलीपसिंह ज. घाटगे स्मृती निवास कर्णबधीर विद्यालयातील मुलांना स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. आपुलकी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मतिवडे (ता. निपाणी) येथील भारतीय समाज सेवा यांच्या अनाथ, बेघर, मतिमंद, मनोरुग्ण, अनाथ आश्रमास जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. यावेळी अमित पिष्टे, सनी जकाते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.