कागल : प.पू. बाबा रवीगिरीजी महाराज व संन्याशांची आडी येथे श्रीदत्त देवस्थान मठास भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : प.पू. बाबा रवीगिरीजी महाराज व संन्याशांची आडी येथे श्रीदत्त देवस्थान मठास भेट
कागल : प.पू. बाबा रवीगिरीजी महाराज व संन्याशांची आडी येथे श्रीदत्त देवस्थान मठास भेट

कागल : प.पू. बाबा रवीगिरीजी महाराज व संन्याशांची आडी येथे श्रीदत्त देवस्थान मठास भेट

sakal_logo
By

04209
कागल : बाबा रवीगिरीजी महाराजांना ‘भाविक भावना’ अंक प्रदानप्रसंगी देताना परमात्मराज महाराज.


बाबा रवीगिरीजी महाराजांची
आडी श्रीदत्त देवस्थानास भेट
कागल , ता. १२ : अनादिकाळापासून सगळ्या साधुसंतांचा एकच आखाडा आहे. तो म्हणजे गुरुदत्तात्रेय आखाडा (दत्त आखाडा). कारण भगवान् दत्तात्रेयांच्या कृपेनेच जगात आखाडा परंपरा अस्तित्वात आली. त्यामुळे आखाड्यांचे साधुसंत दत्तात्रेयांवर श्रद्धा ठेवतात, असे विचार उत्तराखंडमधील आवाहन आखाड्याचे परमपूज्य बाबा रवीगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले. बाबा रवीगिरीजी महाराज व इतर संन्याशी आडी श्रीदत्त देवस्थान मठ भेटीवेळी ते बोलत होते.
दशनाम संन्यास संप्रदायांतर्गत आवाहन आखाड्याचे परमपूज्य बाबा रवी गिरीजी महाराज, प.पू. कपिलगिरीजी, प.पू. गंगागिरीजी, प.पू. रमेशगिरीजी, प.पू. डीसीगिरीजी, प.पू. शेखरगिरीजी, प.पू. नयनगिरीजी, प.पू. बोनागिरीजी इत्यादी साधुसंतांनी श्रीदत्त देवस्थान मठ, आडी येथे येऊन भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. या सर्व साधुसंतांचे डेरास्थान हरिद्वार व ऋषिकेश (उत्तराखंड राज्य) मध्ये आहे. दत्तगुरूंचे दर्शन घेतल्यानंतर या सर्व साधुसंतांनी परमपूज्य परमात्मराज महाराजांशी संवाद साधला. प.पू. महाराजांनी ''भाविक भावना'' अंक वगैरे प्रदान करून त्यांचे आदरातिथ्य केले. परमात्मराज महाराजांनी वर्तेट ग्रंथात आखाडा परंपरेविषयी सांगितले आहे. आखाडा परंपरेत वीस-पंचवीस लाख संन्यासी आहेत. यावेळी देवीदास महाराज, नामदेव महाराज, अमोल महाराज, चिदानंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज, समाधान महाराज, श्रीधर महाराज उपस्थित होते.