कागल : ओढा ओलांडताना पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : ओढा ओलांडताना पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू
कागल : ओढा ओलांडताना पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

कागल : ओढा ओलांडताना पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

ओढा ओलांडताना तरुणाचा बुडून मृत्यू

कागल, ता. १७ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोलनाक्याजवळ शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन वाहनांचा अपघात झाला होता. यावेळी लोक मारतील या भीतीपोटी तेथून मुकेश राजेश शर्मा (वय २२, रा. कंधरापूर, उत्तरप्रदेश ) हा तरुण पळून गेला. करनूर (ता. कागल) येथील ओढा ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात तो बुडाला. त्याला पाण्यातून बाहेर काढून उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले . मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची नोंद कागल पोलिस ठाण्यात झाली आहे.