अजून दोन विधानसभा लढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजून दोन विधानसभा लढणार
अजून दोन विधानसभा लढणार

अजून दोन विधानसभा लढणार

sakal_logo
By

4229
कागल : देसाई कॉलनी येथे कार्यक्रमात बोलताना आमदार हसन मुश्रीफ. या वेळी भय्या माने, पी. बी. घाटगे, सौरभ पाटील आदी.

अजून दोन विधानसभा लढणार
आमदार हसन मुश्रीफ; कागल नगरपरिषदेतर्फे कार्यक्रम
कागल, ता. १७ : गोरगरीब सामान्य जनतेच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी मी गेली ३५ वर्षे कार्यरत आहे. राज्यात पुन्हा सत्ता आल्यास अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणार आहे. अजून दोन विधानसभा निवडणुका लढणार आहे. तसेच खासदारही होणार आहे आणि केंद्रात मंत्रीही होणार आहे. विधानसभा निवडणूक मी ७५ हजार विक्रमी मतांनी जिंकणार आहे, असा आत्मविश्‍वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कागल नगरपरिषदेतर्फे सात घंटागाड्या, फायर बुलेट, देसाई कॉलनी रस्ते, ओपन जिम, अशा एक कोटी ५५ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचा उद्‍घाटन कार्यक्रम झाला. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भय्या माने होते.
मुश्रीफ म्हणाले, ‘‘अडीच पावणेतीन वर्षांच्या सत्ता काळात राज्याच्या ग्रामीण विकासाकरिता हजारो कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे. मतदारसंघातील १३४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा आराखडा तयार केला असून, कागल शहरातील प्रश्‍न मार्गी लावले आहेत. आतापर्यंत सातशे देवालय बांधले आहेत. लोकांनी दिलेल्या संधीचा वापर सामान्य गोरगरिबांच्या उन्नतीकरिता करीत आलो आहे.’’
भय्या माने म्हणाले, ‘‘मागील नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या जाहीरनाम्यातील ९० टक्के कामे पूर्ण झाले आहेत. आगामी निवडणुकीत शिंदे - भाजप गटाचा धुव्वा उडणार आहे.’’
प्रकाश गाडेकर म्हणाले, ‘‘कागलच्या विकासासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी २००० पासून निधी दिला आहे. कोणतेही विकासकाम शिल्लक नाही.’’
के. एस. पाटील यांनी स्वागत केले. प्रवीण काळबर यांनी प्रास्ताविक केले.
सौरभ पाटील यांचेही भाषण झाले. या वेळी नितीन दिंडे, अस्लम मुजावर, इरफान मुजावर, संजय चितारी, ॲड. संग्राम गुरव, बाबासो नाईक, संजय ठाणेकर, पी. बी. घाटगे, संग्राम लाड, नवाज मुश्रीफ, अजित कांबळे, तात्यासो पाटील, विवेक लोटे, रोहित पाटील, शशिकांत नाईक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. बबलू पाटील यांनी आभार मानले.