कागल : कागल ऊरुस चौथा गलेफ संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : कागल ऊरुस चौथा गलेफ संपन्न
कागल : कागल ऊरुस चौथा गलेफ संपन्न

कागल : कागल ऊरुस चौथा गलेफ संपन्न

sakal_logo
By

04279
कागल : गहिनीनाथ गैबीपीर ऊरुसात भाविकांची दर्शनासाठी गर्दी. (छायाचित्र - कुमार मोरे, कागल)

गैबीपीर उरूसात चौथा गलेफ
कंदोरी कार्यक्रम; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

कागल, ता. ३० : ग्रामदैवत व सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील गहिनीनाथ हजरत गैबीपीर ऊरूसाचा मंगळवारी मुख्य दिवस होता. या दिवशी मानाचा चौथा गलेफ अर्पण करण्यात आला. भाविकांनी मोठ्या प्रमाणात गलेफ अर्पण केले. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज मानाचा चौथा गलेफ कागल सीनियर घाटगे घराण्याकडून घालण्यात आला. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी हा गलेफ अर्पण केला. दरम्यान आज आमदार हसन मुश्रीफ यांनीही गलेफ घातला.
येथील श्री गहिनीनाथ गैबीपिराचा ऊरुस पाच दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. उरूसाचा आज मुख्य दिवस चौथा गलेफ (मोठा गलेफ) म्हणून ओळखला जातो. त्याचा मान कागल सिनियर घाटगे घराण्याचा आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात व धार्मिक वातावरणात शाहू ग्रुपचे समरजितसिंह घाटगे यांनी हा गलेफ अर्पण केला. यावेळी वीरेंद्रसिंह घाटगे यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडूनही गलेफ घालण्यात आला. यावेळी सौ. सायरा मुश्रीफ, अन्वर मुश्रीफ, साजिद मुश्रीफ, सौ. सबीना मुश्रीफ, अबीद मुश्रीफ, सौ. नबीला मुश्रीफ, गोकुळ दूध संघाचे संचालक व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ व सौ. अमरीन मुश्रीफ, कु. उसेद मुश्रीफ, कु. राईद मुश्रीफ, कु. माजीन मनगोळी उपस्थित होते.
दरम्यान आज अनेकांनी गलेफ व दंडवत घातले. दोन वर्षे कोरोनामुळे उरुस न झाल्याने मोठ्या प्रमाणात कंदोरी कार्यक्रम करण्यात आले. ऊरूस काळात असणारे विविध प्रकारचे स्टॉल व मनोरंजनाची साधने तसेच दर्शनासाठी दर्ग्यात येणाऱ्या भाविकामुळे रस्ता गर्दीने भरून गेला होता.