कागल : करनूर मध्ये किराणा दुकानात चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : करनूर मध्ये किराणा दुकानात चोरी
कागल : करनूर मध्ये किराणा दुकानात चोरी

कागल : करनूर मध्ये किराणा दुकानात चोरी

sakal_logo
By

करनूरमध्ये किराणा दुकानात चोरी
कागल, ता. १ : रामकृष्णनगर करनूर (ता. कागल) येथील काकासो चौगुले यांच्या मालकीचे अरिहंत किराणा स्टोअर्समध्ये चोरी झाली. चोरांनी सुमारे रोख रक्कम पन्नास हजार व किराणामाल चोरी करून पोबारा केला. काकासो चौगुले हे रात्री आपले किराणा दुकान बंद करून घरी गेले होते. सकाळी चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने दुकानाच्या ड्रॉवमध्ये ठेवलेले रोख रक्कम ५० हजार रुपये, दोन ते अडीच हजार रुपयांचा किराणामाल चोरून पोबारा केला. या घटनेची नोंद कागल पोलिसात झाली.