कागल : विभागीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी १२ खेळाडूंची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : विभागीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी १२ खेळाडूंची निवड
कागल : विभागीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी १२ खेळाडूंची निवड

कागल : विभागीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी १२ खेळाडूंची निवड

sakal_logo
By

विभागीय व्हॉलीबॉल
स्पर्धेसाठी १२ खेळाडूंची निवड

कागल, ता. ५ : विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेची निवड चाचणी श्री शाहू हायस्कूलच्या मैदानावर झाली. जिल्ह्यातील ८ संघांतील ९६ खेळाडू सहभागी झाले होते. यातून १२ खेळाडूंची निवड झाली.
सातारा तालुक्यातील कासेगावला ८ नोव्हेंबरला विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा होतील. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील संघ सहभागी होतील. स्पर्धेतून राज्यस्तरीय संघ निवडण्यात येईल. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीमध्ये २३ ते २५ नोव्हेंबरदरम्यान राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा होतील. भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे सहसचिव प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी व कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सहसचिव प्रा. डॉ. सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी झाल्या. प्रवीण मोरबाळे, रोहित नांदेकर, संग्राम तोडकर यांच्या उपस्थितीत निवड चाचणी झाली. महेश शेडबाळे आणि महादेव कानकेकर यांचे सहकार्य लाभले.
निवड झालेले खेळाडू - धैर्यशील खोत, तन्मय भोसले (कागल), दिग्विजयसिंह यादव, तेजस गोते (लिंगनूर), समर्थ माने, अथर्व मगदूम (जयसिंगपूर), सर्वेश पोतदार, बुध्दिराज माने, प्रथम चव्हाण, मोजीब ताशिलदार (मुरगूड), अदित्य भाकरे, जय रंपुरे (पन्हाळा), समर्थ गुरव (करनूर), प्रथमेश बाबर (कुरुंदवाड).