कागल : २६ ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकांची रणधुमाळी पुढील महिन्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : २६ ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकांची रणधुमाळी पुढील महिन्यात
कागल : २६ ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकांची रणधुमाळी पुढील महिन्यात

कागल : २६ ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकांची रणधुमाळी पुढील महिन्यात

sakal_logo
By

कागलला २६ ग्रामपंचायतींत निवडणुकीची रणधुमाळी
कागल, ता. ९ : कागल तालुक्यातील मुदत संपलेल्या २६ ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकांची रणधुमाळी पुढील महिन्यात होणार आहे. रविवारी (ता. १८ डिसेंबर) मतदान आणि २० डिसेंबरला मतमोजणी आहे. ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ अखेर मुदत संपणाऱ्या २६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. तालुक्यातील रणदिवेवाडी, कसबा सांगाव, बाचणी, बामणी, व्हन्नाळी, हसूर बुद्रुक, कापशी-बाळीक्रे, बाळेघोल, बेलेवाडी काळम्मा, हणबरवाडी, ठाणेवाडी, बोळावी, नंद्याळ, मुगळी, जैन्याळ, करड्याळ, अर्जुनवाडा, चिमगाव, दौलतवाडी, हमिदवाडा, अवचितवाडी, बोरवडे, फराकटेवाडी, पिराचीवाडी, निढोरी व आणूर या २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील. नामनिर्देशनपत्रे २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत स्वीकारली जातील. शासकीय सुटीच्‍या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. छाननी ५ डिसेंबरला होईल. नामनिर्देशनपत्रे ७ डिसेंबरपर्यंत मागे घेता येतील व त्‍याच दिवशी चिन्‍ह वाटप होईल. मतदान १८ डिसेंबरला सकाळी साडेसात ते दुपारी साडेपाच या वेळेत होईल. मतमोजणी २० डिसेंबरला होईल.