मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्या : तहसीलदार ठोकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्या : तहसीलदार ठोकडे
मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्या : तहसीलदार ठोकडे

मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्या : तहसीलदार ठोकडे

sakal_logo
By

मतदार यादीवर हरकतींसाठी
आठ डिसेंबरपर्यंत मुदत
तहसीलदार ठोकडे; विशेष पुनरीक्षण कार्यक्रम
कागल, ता. ९ : कागल विधानसभा मतदार संघांतर्गत निवडणूक आयोगाने छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत एकत्रिकृत प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी बुधवारी करण्यात आली. या मतदार यादीवर दावे व हरकती स्वीकारण्याची मुदत ८ डिसेंबरअखेर आहे, अशी माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठोकडे म्हणाल्या, ‘‘या कार्यक्रमांतर्गत गुरुवारी (ता. १०) ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेत मतदार यादी वाचन करून नवीन मतदान नोंदणी, वगळणी, दुरुस्ती याबाबत ठराव करण्याचे आहेत. १२ व १३ नोव्हेंबर रोजी विद्यार्थी, दिव्यांग व महिला मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर आयोजित केले आहे. पात्र मतदारांच्या नोंदणीसाठी शनिवारी (ता. १९) व रविवारी (ता. २०) तसेच ३ व ४ डिसेंबर रोजी विशेष चार शिबिरे आयोजित केली आहेत. २६ व २७ नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी, देहव्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटक्या विमुक्त जमातीच्या व्यक्ती यांच्यासाठी मतदान नोंदणीसाठी विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. सन २०२३ च्या जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर महिन्याच्या एक तारखेला किंवा त्याच्या आधी ज्यांचे वय १८ वर्षाचे होणार आहे ते या पुनरिक्षण कार्यक्रमात नमुना क्रमांक सहा भरून आगाऊ मतदान नोंदणी करू शकतात. ऑनलाइन मतदान नोंदणी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर करता येते. तसेच बीएलओ व मतदान नोंदणी कार्यालयातर्फे नोंदणी करता येईल. अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.’’ या वेळी नायब तहसीलदार शिवाजीराव गवळी यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.