कागल : राष्ट्रीय लोक अदालतीला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : राष्ट्रीय लोक अदालतीला प्रतिसाद
कागल : राष्ट्रीय लोक अदालतीला प्रतिसाद

कागल : राष्ट्रीय लोक अदालतीला प्रतिसाद

sakal_logo
By

राष्ट्रीय लोकअदालतीत
५१ प्रकरणे निकाली
कागल : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीची आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीला प्रतिसाद मिळाला. या लोकअदालतमध्ये प्रि–लिटीगेशनची बँक १९०० प्रकरणांपैकी ५१ प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. या प्रकरणात ११ लाख ९२ हजार ८०७ रुपये इतक्या रकमेची वसुली करण्यात आली. तसेच प्रलंबित दिवाणी प्रकरणापैकी ७ व फौजदारी ६ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन सदर प्रकरणे निकाली करण्यात आली. तर तडजोड झालेल्या प्रकरणात १९ लाख २९ हजार ९८८ रुपये इतक्या रकमेची वसुली झाली. अशी एकूण ३१ लाख २२ हजार ७९५ रुपयांची वसुली झाली. यावेळी दिवाणी न्यायाधीश ए. बी. जवळे यांनी पॅनेलप्रमुख म्हणून काम पाहिले. ॲड. संग्राम गुरव यांनी पॅनेल सदस्य म्हणून काम पाहिले. दिवाणी न्यायाधीश बी. डी. गोरे यांच्यासह वकील, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.