टू २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टू २
टू २

टू २

sakal_logo
By

04352
कागल ः विजेत्या मंडळाला बक्षीस देताना आमदार मुश्रीफ. शेजारी विनोद मेस्त्री, नवीद मुश्रीफ, प्रवीण काळबर आदी .
------------------

हिंदवी स्वराज्य स्थापनेत
अठरापगड जातींचा समावेश

आमदार मुश्रीफ ; किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण

कागल, ता. १३ : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते रयतेसाठी कसे चालवले हे भावी पिढीला समजणे गरजेचे आहे. यासाठी राज्याभिषेकदिनी शासकीय कार्यालयांत भगवी गुढी उभारावी, राज्याभिषेक दिन करावा असे निर्णय ग्रामविकासमंत्री असताना घेतला, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित नगरसेवक प्रवीण काळबर यांच्यावतीने किल्ला बनवा स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा उभारणीचे काम लवकर पूर्ण करुया. दिवाळी सुट्टीतील प्रवीण काळबर यांचा किल्ला बनवा उपक्रम स्तुत्य आहे.’ जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, ‘खरा इतिहास जनतेसमोर येणे गरजेचे आहे.’ यावेळी लेखक विनोद आनंद मेस्त्री यांचे व्याख्यान झाले.
स्पर्धेत शिवसम्राट वाड्यावरची पोरं ग्रुपने साकारलेल्या तोरणा किल्ल्याला प्रथम क्रमांक मिळाला. शिवाजी महाराज चौक (सुवर्णदुर्ग) द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक बाल गणेश स्पोर्टस् (विजयदुर्ग) ने पटकाविला. विजेत्यांना आमदार मुश्रीफ यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविले. स्पर्धेत ३६ मंडळांनी सहभाग घेतला.
नगरसेवक प्रवीण काळबर यांनी स्वागत केले. कार्यक्रमास गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ, बाबासो नाईक, प्रमोद पाटील, पांडुरंग काळबर, अस्लम मुजावर, नितीन काळबर, विक्रम चव्हाण, शार्दुल पाटील, नवाज मुश्रीफ यांच्यासह नागरिक उपस्थित होते .