कागल : कागलमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : कागलमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा
कागल : कागलमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा

कागल : कागलमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा

sakal_logo
By

कागलमध्ये पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा
कागल, ता. १६ : राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व जिजाऊ महिला महिला समिती यांच्यातर्फे २७ नोव्हेंबरला कागल येथे पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे, अशी माहिती राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे, की शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या युवकांना भरतीत होणाऱ्या लेखी परीक्षेचे स्वरूप समजावे व मैदानावरील प्रात्यक्षिकांचा सराव व्हावा, या एकमेव हेतूने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. एक दिवसाच्या या प्रशिक्षण कार्यशाळेचे स्वरूप असे ः सकाळी नऊ ते दहा- उपस्थितांची नावनोंदणी, अकरा ते दुपारी साडेबारा- लेखी पेपर, दीड ते तीन- मार्गदर्शनपर व्याख्यान व तीन ते चार- मैदानावरील प्रात्यक्षिक व मार्गदर्शन. ही कार्यशाळा श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल, कागल व जागृती हायस्कूल, गडहिंग्लज येथे होणार आहे. इच्छुकांनी नावनोंदणी २४ नोव्हेंबरअखेर करावी.