कागल : मुद्रांक विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : मुद्रांक विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये चोरी
कागल : मुद्रांक विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये चोरी

कागल : मुद्रांक विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये चोरी

sakal_logo
By

कागलला मुद्रांक दुकानांत चोरी
कागल, ता. १८ : येथील तहसीलदार कार्यालयामागील बाजूस असलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या तीन दुकानांमध्ये चोरी झाली. यामध्ये ६६०० रुपयांची रोकड व कागदपत्रे चोरीस गेले आहेत. याबाबतची फिर्याद मुद्रांक विक्रेते अशोक धोंडीराम ससे यांनी कागल पोलीस ठाण्यात दिली आहे. अशोक ससे, मोहन पिष्टे व उत्तम कांबळे यांचे कागल तहसील कार्यालय आवारात मुद्रांक विक्रीची दुकाने आहेत. गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकाने बंद करून सर्वजण गेले असता रात्री अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून या दुकानांमध्ये रोकड मोबाईल व शासकीय कागदपत्रे चोरून नेली आहेत.