कागल : हमीदवाड्यातील ४४ भूखंड धारकांना मिळाली हक्काची मालकीपत्रे.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : हमीदवाड्यातील ४४ भूखंड धारकांना मिळाली हक्काची मालकीपत्रे..
कागल : हमीदवाड्यातील ४४ भूखंड धारकांना मिळाली हक्काची मालकीपत्रे..

कागल : हमीदवाड्यातील ४४ भूखंड धारकांना मिळाली हक्काची मालकीपत्रे..

sakal_logo
By

०४३७५
कागल : हमिदवाडा येथे भूखंडधारकांना स्वमालकीपत्रे देताना आमदार हसन मुश्रीफ. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, विकास पाटील, उमेश डावरे व ग्रामस्थ.


हमीदवाड्यातील ४४ भूखंडधारकांना
मिळाली हक्काची मालकीपत्रे

आमदार मुश्रीफ यांचा पाठपुरावा; ४० वर्षांनंतर मालकी ताबा

कागल, ता. १९ : हमीदवाडा (ता. कागल) येथील ४४ भूखंडधारकांना हक्काची मालकीपत्रे मिळाली आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांच्याहस्ते ती भूखंडधारकांना देण्यात आली. आमदार श्री. मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. ४० वर्षांनंतर भूखंडधारकांना स्वःहक्काची मालकीपत्रे मिळाली आहेत.
१९८० मध्ये भूमिहीन, गरजू व मागासवर्गीय कुटुंबीयांना घरांच्या बांधकामासाठी शासनाच्यावतीने भूखंड देण्यात आले होते. ४४ भूखंडधारकांना भूखंड मिळालेले होते. परंतु मालकीपत्रामध्ये भूखंडधारकांची नावे नव्हती. महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत भूखंडधारकांची नावे तातडीने लावण्याच्या सूचना आमदार श्री. मुश्रीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, राष्ट्रवादीचे कागल तालुकाध्यक्ष विकास पाटील, उमेश डावरे, कृष्णात बंडा बुरटे, आनंदा रंगापुरे, संजय गंदुगडे, जोतिराम मोगणे, प्रदीप वरपे, सिद्राम पाटील, महेश पारळे, विलास कुंभार, संभाजी कुंभार, रघुनाथ गुरव, भगवान चोपडे, श्रीधर बुरटे, तुकाराम किल्लेदार, अमर वासनकर आदींसह भूखंडधारक उपस्थित होते.