कागल : आणखी तीन हजार घरे बांधणार - आमदार हसन मुश्रीफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : आणखी तीन हजार घरे बांधणार - आमदार हसन मुश्रीफ
कागल : आणखी तीन हजार घरे बांधणार - आमदार हसन मुश्रीफ

कागल : आणखी तीन हजार घरे बांधणार - आमदार हसन मुश्रीफ

sakal_logo
By

04390
कागल : शाहूनगर वसाहतीत बगीचाचे लोकार्पण आमदार मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी चंद्रकांत गवळी, प्रकाश गाडेकर, प्रताप माने.

कागलमध्ये तीन हजार घरे बांधणार
आमदार मुश्रीफ ; सात कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण

कागल, ता. २१: शहरात राहणाऱ्या प्रत्येकाला हक्काचा निवारा मिळालाच पाहिजे म्हणून संघर्ष केला. त्या भावनेतूनच तीन हजारांहून अधिक घरे बांधून दिली. गरजूंसाठी नगरपरिषदेच्यावतीने आणखी तीन हजार घरे बांधणार आहे. कागल महाराष्ट्रात नेहमीच अव्वलस्थानी असेल, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले.
येथील शाहूनगर वसाहतीत सात कोटींच्या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात आमदार मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक चंद्रकांत गवळी होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘गोरगरिबांच्या जीवनात चांगले दिवस यावेत या भूमिकेतून कार्यरत राहिलो. त्यातूनच वृद्ध आई-वडिलांना एकत्र श्रावणबाळ योजनेची पेन्शन देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले. अमुक घरात जन्मलो, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलो, असे सांगणाऱ्यांचे दिवस कधीच निघून गेलेले आहेत.’
माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले, ‘एकीकडे आमदार हसन मुश्रीफ यांनी गोरगरिबांच्या सेवेचे पुण्याईचे मोठे काम केले. दुसऱ्या बाजूला समरजितसिंह घाटगे यांनी निराधारांच्या पेन्शन बंद करून चुलीत पाणी ओतले. आमचा पक्ष गोरगरिबांच्या सेवेतून समाजकार्य करणारा आहे. निव्वळ मते मागायला येणारा नाही.’ यावेळी युवा कार्यकर्ते महेश गाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना तीन हजार वह्यांचे वाटप झाले. केडीसीसीची संचालक प्रताप उर्फ भैया माने, नगरसेवक प्रवीण काळबर, उदय काटकर, राजू सातपुते यांचीही भाषणे झाली. स्वागत राजू सातपुते व सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. प्रास्ताविक प्रवीण काळबर यांनी केले. आभार अशोक रावण यांनी मानले.

चौकट
...तर कागल सोडून जातो
प्रकाश गाडेकर म्हणाले, ’बेघरांना घरासाठी जागा दिली अशा वल्गना करणाऱ्या समरजितसिंह घाटगे यांनी एक गुंठा तरी दिल्याचे दाखवून द्यावे. कागल शहर सोडून जातो, असे आव्हानही श्री. गाडेकर यांनी दिले.