कागल : कसबा सांगाव येथील सहाजणांच्या विरोधात छेडछाड व मारहाणीचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : कसबा सांगाव येथील सहाजणांच्या विरोधात छेडछाड व मारहाणीचा गुन्हा दाखल
कागल : कसबा सांगाव येथील सहाजणांच्या विरोधात छेडछाड व मारहाणीचा गुन्हा दाखल

कागल : कसबा सांगाव येथील सहाजणांच्या विरोधात छेडछाड व मारहाणीचा गुन्हा दाखल

sakal_logo
By

मारहाण प्रकरणी ६ जणांवर गुन्हा
कागल : कसबा सांगाव (ता. कागल) येथे मातंग समाजातील पंच लोकांनी दिलेल्या वाढीव प्लॉटच्या कारणावरून शिवीगाळ, छेडछाड व मारहाण प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास राजीव गांधीनगर माळभाग येथे घडली. प्रतीक्षा अनिकेत भिंगारे यांनी याबाबतची फिर्याद कागल पोलिसात दिली आहे. विनायक शिवाजी आवळे, उत्तम रावसाहेब आवळे, किसन भरमा आवळे, संग्राम गुंडा आवळे, शिवाजी दशरथ आवळे व शाम आवळे यांनी फिर्यादी प्रतीक्षाचे पती अनिकेत भिंगारे, संजय भिंगारे, सुधीर भिंगारे यांना बांबूने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे करीत आहेत.