
कागल : पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
04435
कागल :पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सौ. नवोदिता घाटगे
स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन व्हावे
सौ. नवोदिता घाटगे; कागलला पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा
कागल, ता. १ : तालुक्यातील गोरगरीब, दीनदलितांना सक्षम व्यासपीठ मिळावे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन व्हावे या हेतूने पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा घेतली. यातून विद्यार्थी त्यांच्या ध्येयापर्यंत निश्चित पोचतील, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी व्यक्त केला.
राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिरमध्ये मोफत पोलिस भरतीपूर्व कार्यशाळा झाली. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी प्रात्यक्षिकांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले. कार्यशाळेत १३९ मुले तर ५४ मुलींनी सहभाग नोंदवला. यावेळी झालेल्या सराव परीक्षेत अनुक्रमे अरविंद पोवार, दिप्तीक पाटील, सुनील पोवार, राहुल कोरवी, विनायक माणगावकर या पहिल्या आलेल्या पाच विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.
यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दीपक वाकचौरे म्हणाले, ‘तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करून अभ्यासाला प्रयत्नांची जोड दिल्यास यश हमखास मिळेल.’ पोलिस उपनिरीक्षक मोनिका खडके यांनी स्वतःच्या पोलिस भरतीचा अनुभव सांगितला.
कार्यक्रमात मंझिल अकॅडमी, कोल्हापूरचे संचालक अमोल खोत यांनी बदलते स्पर्धा परीक्षेचे स्वरूपाबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी कागलचे पोलिस निरीक्षक अजितकुमार जाधव, शाहू साखर कारखान्याचे संचालक सचिन मगदूम, राजे विक्रमसिंह घाटगे ॲकॅडमीचे संचालक चव्हाण, मारुती मदारे, संदीप नेर्ले, अश्विन नाईक, मुख्याध्यापक एस. डी. खोत, मुख्याध्यापिका जे. व्ही. चव्हाणसह श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलचा शिक्षकवर्ग उपस्थित होता. सौ. एस. बी. सासमिले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जयश्री पाटील यांनी आभार मानले.