
कागल : आडी येथे ४ डिसेंबर रोजी सामूहिक जप सोहळ्याचे विशेष आयोजन
आडी येथे उद्या सामूहिक जप सोहळा
परमाब्धि विचार महोत्सव ७ डिसेंबरअखेर
कागल, ता. २ : आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्ताने परमाब्धि विचार महोत्सव बुधवार (ता. ७)अखेर आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी (ता. ४) सामूहिक जप सोहळ्याचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
दैनंदिन कार्यक्रमांमध्ये सकाळी ६ वा. सुप्रभात गीत गायन, नित्यारती, जप, होईल. सकाळी ७.३० वा. पासून १२ वाजेपर्यंत सुरुवातीचे तीन दिवस परमाब्धि पारायण, त्यानंतरचे पाच दिवस गुरुचरित्र पारायण होणार आहे. दुपारी १२ नंतर नित्यारती व महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ भजन विभा कार्यक्रम दत्त मंदिरात होईल. सायंकाळी ५ नंतर भजन संध्या कार्यक्रम सर्वेज्य सांस्कृतिक भवनात होईल. रात्री साडेसात वाजता नामजप व त्यानंतर लगेच परमात्मराज महाराजांचे प्रवचन होणार आहे. प्रवचनानंतर मान्यवरांचा सत्कार व महाप्रसाद होणार आहे. रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत आडी, हणबरवाडी, हंचिनाळ, इत्यादी गावांमधून आंबील घागरीचे मिरवणुकीने आगमन होईल.
सकाळी १० ते दुपारी दीड वाजेपर्यंत सामूहिक जप सोहळा होणार आहे. सामूहिक जप सोहळ्यामध्ये ''जय परेश सर्वायण'' वैश्विक मंत्राचा जप होईल. या सोहळ्याला स्वामी सत्यानंद गिरीजी महाराज शास्त्री (मध्य प्रदेश), स्वामी प्रकाशानंद सरस्वती जी महाराज (भरूच, गुजरात), स्वामी अनंतानंद सरस्वतीजी महाराज झारखंड, स्वामी मुनीशानंद सरस्वतीजी महाराज (अलीगड, उत्तर प्रदेश), स्वामी कृष्णानंद तीर्थ जी महाराज ( वैजनाथ, हिमाचल प्रदेश), स्वामी कौशलेन्द्रजी महाराज (कांगडा, हिमाचल प्रदेश) उपस्थित राहणार आहेत. बुधवारी (ता. ७) दुपारी ३ ते ५ या वेळेत धोंडिराम मगदूम महाराज (दऱ्याचे वडगाव ) यांचे दत्त जन्मात्कानावर कीर्तन होईल. सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी श्री दत्त जन्म सोहळा व महाप्रसाद होईल.