कागल : पाच कोटीच्या कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : पाच कोटीच्या कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न
कागल : पाच कोटीच्या कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

कागल : पाच कोटीच्या कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

sakal_logo
By

०४४८६
कागल : येथे खड्डेमुक्त कागल कामाचा प्रारंभी बोलताना आमदार मुश्रीफ, व्यासपीठावर भैया माने, प्रकाश गाडेकर, नवल बोते, पी. बी. घाटगे आदी.

ांग्रामीण विकासासाठी
पंधराशे कोटींचा निधी

आमदार मुश्रीफ; पाच कोटींच्या कामांचे लोकार्पण

कागल, ता. १२ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकासमंत्री असताना त्यांनी कागल पालिकेला १०० कोटी, मुरगूड पालिकेला २५ कोटी, गडहिंग्लज पालिका ५० कोटी असा पावणेदोनशे कोटींचा निधी द्यायचा आणि मी त्यांना ग्रामीण विकासासाठी २०० कोटींचा निधी द्यायचा, असे ठरले होते. त्यामुळेच मतदारसंघातील शहरांची कामे झाली. त्यातूनच उपनगरांची कामे करू शकलो. १५०० कोटींचा निधी ग्रामीण विकासासाठी आणला, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
येथील कमल अनंत पार्कमध्ये ‘खड्डेमुक्त कागल’ कामाचा प्रारंभ व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पाच कोटींच्या कामांचा लोकार्पण सोहळ्यात आमदार मुश्रीफ बोलत होते.
जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, ‘शहरात कमल अनंत पार्क नावाने सुंदर वसाहत नावारूपाला आली. आमदार मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली काम करताना दुजाभाव केला नाही.’ माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले, ‘महामानवांच्या अपमानाचे षडयंत्र रचले जात आहे, जनता हे खपवून घेणार नाही.’ यावेळी बाळासाहेब हवालदार, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांची मनोगते झाली. सुधाकर डिग्रजकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष नवल बोते, पी. बी. घाटगे, शानूर पखाली, अस्लम मुजावर, सौरभ पाटील, नवाज मुश्रीफ, संजय चितारी, आशा जगदाळेंसह कार्यकर्ते उपस्थित होते.