कागल : श्री शाहू हायस्कूल मधील १९६७ च्या दहावीच्या वर्गाचा स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : श्री शाहू हायस्कूल मधील १९६७ च्या दहावीच्या वर्गाचा स्नेहमेळावा
कागल : श्री शाहू हायस्कूल मधील १९६७ च्या दहावीच्या वर्गाचा स्नेहमेळावा

कागल : श्री शाहू हायस्कूल मधील १९६७ च्या दहावीच्या वर्गाचा स्नेहमेळावा

sakal_logo
By

B04510
कागल : स्नेहमेळाव्यास उपस्थित शिक्षक व विद्यार्थी

शाहू हायस्कूलमध्ये
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

कागल, ता. १९ : येथील श्री शाहू हायस्कूलमधील १९६७ च्या दहावीच्या वर्गाचा स्नेहमेळावा झाला. प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर पोतदार, पी. बी. घाटगे, दिनकर प्रभावळकर, श्रीमती सुधाताई कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी सुधाकर पोतदार म्हणाले, ‘प्रदीर्घ कालावधीनंतरही आमची आठवण असणे, हे सुखदायी आहे. मेळाव्याने उर्वरित आयुष्य आनंदी होईल.’ सुधाताई म्हणाल्या, ‘महाभारत, ज्ञानेश्वरीचे आनंदी जीवनासाठी वाचन करा. एक तरी ओवी अनुभवावी या वृत्तीने कार्यरत राहा.’ पी. बी. घाटगे यांनी, जे विद्यार्थी खेळामध्ये चमकले ते पाहून कौतुकच केले असे सांगून आपल्या कारकिर्दीचे चढ-उतार सांगितले. दिनकर प्रभावळकर यांनी हिंदीत शुभेच्छा दिल्या. दिलीप जगदाळे यांनी स्वागत, प्रा. चंद्रकांत जोशी, विजय बोंगाळे, विलास जाधव, अण्णासो यादव, एस. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दिलीप जगदाळे यांनी आभार मानले.