
कागल : कोल्ह्याची दोन नवजात पिल्लं आढळली
04605
कागल : कोल्ह्याच्या पिलांना दूध पाजविताना ऊसतोडणी मजुराची मुले.
कागलला आढळली
कोल्ह्याची दोन पिलं
कागल : येथील घाटगे मळ्यात महेश घाटगे व योगेश घाटगे यांच्या शेतात ऊसतोडणीवेळी कोल्ह्याची दोन नवजात पिलं आढळली. वन्यजीव विभागाच्या बचाव पथकाने ही पिलं नेली असून ही पिले त्यांच्या आईजवळ पोचविण्यासाठी वन विभाग प्रयत्न करणार आहे.
पिले आढळताच घाटगे बंधूंनी वन विभागाला माहिती दिली. करवीर वनपरिक्षेत्रधिकारी रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे वन्यजीव बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या ताब्यात पिले देण्यात आली. दरम्यान पिलांना दूध देण्यात आले. नवजात पिले ५ ते १० दिवसांची असल्याने त्यांना आईपर्यंत पोचवणे वन विभागासाठी आव्हान आहे. कोल्हापूर वनविभाग मुख्य वनसंरक्षक रामानुजम, उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथकाने पिलांना नेले आहे. पिले त्यांच्या आईजवळ पोचविण्यासाठी कॅमेरा लावणार आहेत.