Wed, Feb 8, 2023

कागल : वीजेचा शॉक लागून मृत्यू
कागल : वीजेचा शॉक लागून मृत्यू
Published on : 15 January 2023, 6:07 am
कागलमध्ये विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
कागल : लोखंडी जिन्यावर उभे राहिले असताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाला. येथील शाहूनगर बेघर वसाहतमध्ये सकाळी ही घटना घडली. धोंडिराम बापू सणगर (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. घराच्या बाहेरील बाजूस असलेल्या लोखंडी जिन्यावर पहिल्या पायरीवर उभे असताना त्यांना विजेचा धक्का बसल्याने ते ओरडत होते. यावेळी घरातील मेन स्वीच बंद केल्यावर ते लोखंडी जिन्यावरून खाली पडले. त्यांना उपचाराकरिता नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.